‘चित्राताई, अशानं हसं होतं बरं का’, रोहिणी खडसेंची टीका, BJP चा अख्खा इतिहासच काढला

  • Written By: Published:
‘चित्राताई, अशानं हसं होतं बरं का’, रोहिणी खडसेंची टीका, BJP चा अख्खा इतिहासच काढला

Rohini Khadse on chitra wagh : विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लेक लाडकी नावाची (Lek Ladaki) योजना जाहीर केली आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर (BJP) कडक शब्दांत टीका केली. महिलांचा द्वेष करणारा पक्ष आता लेक लाडकी म्हणत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, त्यांच्या वादात आता राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी उडी घेतली. त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय ठरले ? ठाकरेंची उद्या दहाची ‘डेडलाइन’ 

रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत लिहिलं की, अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांचा सन्मान दिलो जातो, हे तुम्हाला कोणी सांगितलं बर? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला माहित आहे काय आहे ते… बरं ठिक, तुमचं म्हणणं बरोबर आहे, असं म्हटलं तर मग, आदरणीय पंकजाताईंवर अन्याय कशासाठी सुरू आहे हो? जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना, असा सवाल केला.

त्यांनी पुढं लिहिलं की, केवळ त्याच नाही तर ज्यांनी पक्ष वाढविला, तळागाळात पोहचवला. त्या स्व. प्रमोदजी महाजन यांच्या कन्या खा. पुनमताई महाजन सध्या कुठेच दिसत नाहीत हो…. आणि पुण्यतल्या मा. मेधाताई कुलकर्णी यांचे काय? त्यांची जागी मा. चंद्रकांतदादांनी हिसकावली, नंतर त्यांच्या हातावर अक्षता देण्यात आल्या हा त्यांचेवर अन्याय नाही का?

बरं, राज्यापुरतं हे मर्यादित नाही बरं का, चित्राताई…. अगदी दिल्लीत देखील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्यावरही अन्याय झाला आहे. तुम्हाला माहितीच घ्यायची ना? तर मा. वसंधुरा राजेंना विचारा अन्याय काय असतो ते.. अगदीचं झालं तर आदरणीय सुमित्राताई महाजन यांनाही विचारा की, पक्षात अन्याय कसा असतो ते….

राहीले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, तर इथे जर महिलांवर अन्याय होत असता तर तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो? उगाच टीका करायची म्हणून काहीही करू नका ताई… अशानं हसं होतं बरं का, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सुळेंची टीका काय ?
महिलांचा द्वेष करणारा पक्ष आता लेक लाडकी म्हणू लागला. मी अनेक वर्षांपासून सर्वांना जवळून पाहत आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा मान सर्वोच्च पदावर असलेल्या एका महिलेला गेला. पण, तो दिला नाही. दिवंगत सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. या सगळ्या त्यांच्या वडिलांच्या लाडक्या लेकी होत्या, अशी टीका त्यांनी केली होती.

दरम्यान, रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube