Download App

पवार आजारी असतांना तो साधा भेटायलाही आला नाही, ही राऊतांची खंत; तटकरेंचा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare On Sanjay Raut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बडे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी पवारांची भेट टाळली होती. याची खंत खुद्द खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मला बोलून दाखवली होती, असा खळबळजनक खुलासा शरद पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला.

तुम्ही आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात; तटकरेंनी राऊतांना फटकारले !

सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केला. ते म्हणाले की, खासदार संजय राऊतांनी माझ्याकडे येऊन वारंवार उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीबद्दल तक्रारी केल्या. पवार आजारी असतांना तो साधा भेटायलाही येऊ शकत नाही का? राऊत उद्धव ठाकरेंनी खाजगीत अरे तुरे म्हणतात… वर्षा बंगला आणि सिल्वर ओक फार लांब नव्हतं. पण, तीन चार-महिने ठाकरे आणि पवार यांच्यात संवाद झाला नाही, अशी नाराजी राऊतांनी बोलून दाखवली होती.

‘सामना’च्या अग्रलेखात राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत यांनी अजित दादांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी अजित पवारांचा सिंचनदादा असा उल्लेख केला. त्यावर बोलतांना तटकरे म्हणाले की, राऊत तुम्ही टिका जरुर करा. पण कुठल्याही तपास यंत्रणांच्या तपासात अजितदादा किंवा मला आरोपी केले गेले नाही. उलट तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही, असेही तटकरेंनी खडसावून सांगितलं. टिका करताना सभ्य भाषेत करा, पातळी सोडून करु नका असा इशाराही तटकरेंनी दिला.

तटकरे म्हणाले, कालपर्यंत अजितदादांसारखे दुसरं नेतृत्व नाही, असं तुम्ही म्हणायचा आणि आज अशा प्रकारची टिका करता, हे करणे योग्य नाही, असं तटकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या उद्धव ठाकरेंचं मन विचलीत झाल, त्यांना भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करावं वाटतं, असं राऊतांनी आम्हाला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Tags

follow us