Sunil Tatkare : मोहोळमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) गटबाजी उघड झाली. मोहोळचे आमदार यशवंत मानेंनी (Yashwant Mane) भर सभेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांची तक्रार तक्रार केली. विरोधकांबरोबर संधान साधून माझ्या विरोधात खालच्या पातळीची भाषा वापलली जाते असल्याचा आरोप त्यांनी केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) उमेश पाटलांना कडक इशारा दिला.
काहीतरी मोठं घडणार, लेबनॉन लवकर सोडा, अमेरिकेसह ‘या’ देशांनी जारी केला अलर्ट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, असं तटकरे म्हणाले.
आज मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा झाली. या यात्रेच्या सभेत बोलताना यशवंत मानेंनी उमेश पाटील हे राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतात. माजी आमदार राजन पाटील आणि माझ्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलतं जातं, हे कुठंतरी थांबले पाहिजे, अशी मागणी केली.
बेशिस्त खपवून घेतली जाणार
मानेंनी केलेल्या तक्रारीची सुनील तटकरे यांनी दखल घेतली. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 2014 ते 2018 या काळात मी काम केलं. आताही गेल्या वर्षभरापासून पुन्हा प्रदेशाध्यक्षपदावर काम करत आहे. राष्ट्रवादी पक्ष शिस्तीत चालेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही संबंधितांना देतो. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांना लक्ष्य करत राष्ट्रवादीच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस नक्कीच करेल, एवढा विश्वास देतो, असं तटकरे म्हणाले.
काय होती यशवंत माने यांची तक्रार?
सुनील तटकरे, तुम्ही शिस्तप्रिय आहात. बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुम्ही दोघे शिस्तप्रिय नेते आहात. पण, मी मोहोळ मतदारसंघात मी सांगू नये पण सांगतो. आपल्या नावाचा वापर करून पक्षात बेशिस्त वर्तन करणाऱ्यांची संख्या वाढली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे, असं माने म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण दिलेला उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल; त्यामुळे विरोधकांसोबतत संधान साधून माजी आमदार राजन पाटील, त्यांची दोन मुले आणि माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहे. आमच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली जाते. हे कुठेतरी थांबवायला हवं, एवढीच विनंती, असं माने म्हणाले.