नवी दिल्ली ः भारतात फेकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात भारतीय जनता पार्टी (BJP) या पक्षामध्ये फेकणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या काही वर्षांत भाजपमधील नेत्यांची भाषणं, वक्तव्य पाहिली तर याची खात्रीच पटते, असे थेट आराेप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.
एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. भाजपमध्ये सर्वात जास्त फेकणारे काेण आहे, असे आपल्याला वाटते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी भाजपमध्ये सर्वात जास्त फेकतात. तेव्हा माझ्या समाेर काेण एक यात नाही. तर आलीकडील काळात म्हणजे गेल्या पाच-सहा वर्षांच्या काळात पाहायचे झाले तर भाजपच्या ३०२ चा विचार केला तर सर्वच फेकत असल्याचे आपल्याला पाहयला मिळेल. त्यामुळे तिकडे सर्वच जण काेणत्याही गाेष्टीचा विचार न करता, गाेष्टींची खातरजमा न करता मनाला वाटेल ते फेकत असतात. प्रत्यक्षात त्या गाेष्टीं हाेताना दिसत नाही.
देशात, प्रत्येक राज्यात काेणत्याही काळात काही जण फेकणारे आपल्याला आढळत असतात. देशात सध्या फेकणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे वाटतेय की देशात फेकणार्यांची एक टाेळी तयार झाली आहे, असा थेट आराेप सुप्रिया सुळे यांनी या मुलाखतीत केला.