Download App

Supriya Sule : माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर कुठेही बसून चर्चा करेल; सुप्रिया सुळेंचं आव्हान

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा उमेदवार कुणाकडेही असेल तरी माझी ते म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा तिथे बसून चर्चा करण्याची तयारी आहे. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

India Alliance वाल्यांचे पंतप्रधान, अर्थमंत्री होण्याचे स्वप्न हास्य जत्रेलाही टफ फाईट देतील; शिंदेंचा टोला

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीकरांनी मला तीन वेळा मतदान करून निवडून दिलं. त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. तसेच माझं बारामतीकरांना आवाहन आहे. त्यांनी मला मेरिटवर पास करावं. त्यामध्ये मी केलेलं काम, विकास, माझा जनक संपर्क या सगळ्या गोष्टी बघितल्या जाव्यात. कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व गोष्टी आवश्यक असतात. लोकप्रतिनिधी हा संसदेत मतदारसंघाचे प्रश्न मांडणारा, मतदारसंघाला वेळ देणारा, विकास काम करणारा तसेच भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा असा असावा.

दिल्लीसमोर लोटांगण घालायचे काम, आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

त्यामुळे मला मेरिटवर विजयी करा अशी मी विनंती माझ्या मतदारांना करते. मी पंधरा वर्षांपासून बारामती मतदारसंघातून खासदार आहे. त्या अगोदरही मी तीन वर्ष राज्यसभेत काम केलं. त्या अगोदर दोन वर्षे भटक्या विमुक्त समाजामध्ये काम केलं. तसेच मी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या अगोदर दोन वर्षे संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा राजकारणात आलेली नाही.

त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा उमेदवार कुणाकडेही असेल तरी माझी ते म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा तिथे बसून चर्चा करण्याची तयारी आहे. त्यामुळे ही कौटुंबिक लढाई नाही तर राजकीय लढाई असल्याचे सूचक वक्तव्यावेळी सुळे यांनी केला. तसेच बारामतीत उमेदवार कोणीही असो ही लढाई वैचारिक असेल असं आव्हानही यावेळी सुळे यांनी दिलं.

follow us