Supriya Sule on Devendra Fadanvis : च्यूईंगम ज्याप्रमाणे चघळून चघळून टेस्टेलेस होतं त्यासारखा पहाटेच्या शपथविधीचा विषय टेस्टेलेस झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेले आहेत. अशी मिश्कील टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील महागाईवरून शिंदे-फडणवीसांवर टीका केली. (Supriya Sule Criticize Devendra Fadanvis on Oath ceremony of Fadanvis and Ajit Pawar )
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! शहरात तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला…
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील शिंदे फडणवीसांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. यावर आजच अजितदादांनी या सरकारच्या कामगिरीवर आणि अपयशावर लेख लिहिला आहे. त्यामुळे या सरकारने एक वर्षात आपल्याला काय दिलं हे कळत. तसेच मला या सरकारला विचारला विचारायचं आहे की, कांद्याला भाव आहे का? टोमॅटोचे काय हाल आहेत? एफ आर पी काय आहे? असा सवाल सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केला आहे.
त्याचबरोबर यावेळी पत्रकारांनी सुळे यांनी शरद पवारांवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे त्यावर विचारले असता त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये टीका-टीपण्णी झालीच पाहिजे. तसेच शरद पवारांवर गेली 50-55 वर्ष टीका होतच आहे. कारण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय बातमी होतच नाही. तसेच आंब्याच्याच झाडाला दगड मारले जातात. बाभळीच्या झाडाला दगड मारले जा नाहीत. असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला उत्तर दिलं.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यात जोरदार जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला. असं म्हटलं तसेच ते असं देखील म्हणाले की, शरद पवारांच्या तोंडी मी सत्य आणले याचा मला मोठा आनंद झाला आहे. परंतु हे अर्धच सत्य आहे. पवारांनी पूर्ण सत्य सांगितले नाही. मी गुगली फेकून पूर्ण सत्य बाहेर आणणार आहे. यातून मी बोल्ड झालेलो नाही. त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच बोल्ड केले आहे.