Download App

राष्ट्रवादीत फूट नसल्याच्या विधानावर सुप्रिया सुळे ठाम, ‘आमचे अध्यक्ष आणि पक्ष एकच’

  • Written By: Last Updated:

Supriya Sule on Ajit Pawar : ‘अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही’, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानाला आधी शरद पवारांनी पाठिंबा दिला नंतर घुमजाव केले होते. पण सुप्रिया सुळे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहे. मी आधी जे बोलले त्यावर मी ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीतील एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवार आणि नऊ मंत्र्याबाबत पक्षाची भूमिका काय आहे? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की पक्षातील नऊ आमदाराने दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे इतकेच. त्यांना नोटीस पाठवलेली आहे. पक्षांमध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्याना निलंबित करण्याबाबत पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील मोठ्या उद्योगपतीच्या घरी शरद पवार यांची अजित पवार यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती. तुमची अजित पवार यांच्यासोबत भेट झाली का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी दादांबरोबर गुप्त बैठका केल्या नाहीत. भावाला भेटायला गुप्तता बाळगण्याचे कारणच काय? आम्ही पारदर्शीपणे काम करतो.

‘मोदींशिवाय देशाला पर्याय नाही हे पवारांनी मान्य केलंय’; गिरीश महाजन यांचं मोठं विधान

सातारा येथे शरद पवार यांनी अजित पवारांना पुन्हा संधी दिली जाणारी असे म्हटले होते. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत आले तर परत घेणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की याविषयी बोलण्या इतपत मी मोठी नाही. शरद पवार सकाळी बोलले, तो त्यांचाच अधिकार आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट, असे त्यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे सरकारसोबत येतील असे विधान केले होते. त्यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी बावनकुळे यांचे आभार मानते. 303 खासदार आणि 105 आमदार त्यांच्याकडे आहेत. तरीदेखील त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्याकडे यावेसे वाटतात. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कुछ तो खास बात है.

अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव

केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये धोरण लकवा आहे. कांद्याच्या विषयावर राज्याचे कृषिमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले असताना ती भेट पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री जपान मधून कांद्याविषयीचा निर्णय ट्विट करून घोषित करतात. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही माहिती नसते. अंधारात ठेवून निर्णय घेतले जातात जी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की उपमुख्यमंत्री जपानमधून करतात. कशाचा कशाला मेळ नाही. हा मुख्यमंत्र्यांचा देखील अपमान आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Tags

follow us