‘मोदींशिवाय देशाला पर्याय नाही हे पवारांनी मान्य केलंय’; गिरीश महाजन यांचं मोठं विधान
Girish Mahajan on Sharad pawar : अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर वारंवार शरद पवारांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांसह सर्वच बंडखोरांनी प्रयत्न केले. मात्र,शरद पवारांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र,आज शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवार हे आमचेच नेते आहेत,असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मोदींशिवाय देशाला पर्याय नाही हे मान्य केलंय, असं महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरही ते बोलले. ते म्हणाल की, शरद पवारांच्या वक्तव्याचं स्वागतच आहे. त्यांनी जे विधान केलं, त्याचं स्वागतच.त्यांनी आता मान्य केलं आहे की, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. शरद पवारांच्या या निर्णयाचं स्वागतच करतो. मात्र, एका ठिकाणी एक म्हणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी विरोधात भूमिका घ्यायची ही दुहेरी भूमिका नको, असं महाजन म्हणाले.
महाजन म्हणाले, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, हे त्यांनी आता मान्य केलं. त्यांच्या दोघांत एकमत होईल आणि सर्वजण आमच्या सोबत काम करतील, असं महाजन म्हणाले.
इंडिया आघाडीबाबत बोलताना महाजन म्हणाले, मला वाटतं की, हे लोक थोड्या काळासाठी आहेत. प्रत्येक राज्यात माझं कुटुंब वाचवा हाच अजेंडा आहे. विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यांच्यात कोणतेही एकमत नाही. हे लोक काही दिवसांनी भरकटलेले दिसतील, कितीही लोक एकत्र आले, कितीही सभा घेतल्या तरी जनता मात्र मोदींच्या पाठीशी आहे.
Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’
सी वोटर विषयी विचारले असता महाजन म्हणाले, मी तुम्हाला सांगतो की आम्ही 325 चा आकडा पार करू. जगामध्ये देशाची प्रतिमा उंचावली आहे.महाराष्ट्रात एक सुध्दा जागा कमी घेणार नाही. पुन्हा सांगतो ४८ जागा महायुतीला मिळणार आहेत.
सह्याद्रीवरील बैठकीबाबत महाजन म्हणाले, काल सह्याद्रीवर बैठक झाली. आम्हाला मुंबईत एक फेस्टिवल घ्यायचा आहे. इंटरनेशनल टुरिझम असा विषय घेऊन आम्ही सर्व फेस्टिवल एकत्र करून मुंबई इंटरनॅशनल फेस्टिवल घेणार आहोत. परदेशी नागरिकांना सर्व समजावे याकरता फेस्टिवल घेत आहोत.