Download App

भास्कर जाधवांना सुप्रिया सुळेंची ऑफर, मनावर घ्या! तुम्हालाही खासदार करु

मुंबई : सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिलाय. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. पण आजच्या घडीला व्यासपीठावरचं चित्र बघितलं तर दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद दिसतोय, अशी टोलेबाजी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केली.

भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाधवांना खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. भास्कर जाधव तुम्ही मनावर घेत असाल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा करु, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माजी मंत्री भास्कर जाधव यांनी तुफान टोलेबाजी केली. दिल्लीच्या संधीवरुन भास्कर जाधवांनी तटकरेंना ‘शुभेच्छा’ दिल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही भास्कर जाधवांना थेट खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. कोकणातून दोन खासदार दिल्लीत येतात, जर भास्कर जाधवांची इच्छाच असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा करु, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तटकरे आणि आपला प्रवास सारखाच असल्याचं नमूद करत, आमचा पाठशिवणीचा खेळ आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. दोघांनी सारखीच पदं भूषवली. पण आता तटकरे दिल्लीत आहे, मात्र मला दिल्लीची संधी दिसत नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.

“राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि माझा आतापर्यंतचा प्रवास सारखाच राहिला आहे. आमचा पाठशिवणीचा खेळ आहे. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार, मी आमदार, तुम्ही मंत्री मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री, मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलो आहोत. तुम्ही विधानपरिषद मी विधानपरिषद. पण आता दिल्लीत जाण्याचा रस्ता बंद आहे.”

”आजच्या घडीला व्यासपीठावरचं चित्र बघितलं तर मला संधी नाही. पण दादा म्हणाले, सुनील तटकरेंना महाराष्ट्रात बोलवा, भास्कर जाधवांना दिल्लीत पाठवा. असं मी म्हणत नाही, तटकरेंना दिल्लीसाठीच्या शुभेच्छा देतो”, अशी टोलेबाजी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केली.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी दिल्लीवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाधवांना खासदारकी लढवण्याची ऑफर दिली. सुप्रिया म्हणाल्या, “कोकणातून दोन खासदार येतात. त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही मनावर घेत असाल तर तसा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत मांडण्यात येईल. दिल्लीला येण्यासाठी कोणी इच्छुक नसतं, मात्र भास्कर जाधव यांनी इच्छा व्यक्त केलीय त्यामुळे कौतुक आहे”

Tags

follow us