Download App

Video : धनंजय मुंडे दिल्लीत, धसांनी बाहेर काढला ७३ कोटींचा घोटाळा

धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना ३७ कोटी ७० लाख रुपयांची काम न करता बोगस बिलं उचलली, असा आरोप आमदार धस यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्याविरोधात फास आवळला जातोय. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यासह विरोधकांनी दबाव वाढवला आहे. आता धस यांनी नव्यानं त्यांनी काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करत मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला.

निरगुडी व वडगाव शिंदे येथे वन उद्यान उभारा; अजितदादांकडे बापूसाहेब पठारे यांची मागणी 

धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना ७३ कोटी ३६ लाख रुपयांची काम न करता बोगस बिलं उचलली, असा आरोप आमदार धस यांनी केला.

पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं…

बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ३० जानेवारी रोजी बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकी आधीच सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले. यावेळी बोलतांना धस म्हणाले, २०२१ ते २०२२ या काळात पालकमंत्री कोण होते? तर धनंजय मुंडे. पालकमंत्र्यांनी हे पद भाड्याने दिलं होतं. त्यांच्या काळात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बोगसं बिलं उचलण्यात आली. परळी आणि अंबेजोगाई येथे कोणतेही काम न करता ही बिलं उचलली.

३० डिसेंबर २०२१ रोजी २ कोटी ३१ लाख, १८ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बीड यांनी १० कोटी ९८ लाख, २५ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अंबाजोगाई यांनी ६ कोटी ५९ लाख, २६ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक २ यांनी १६ कोटी ४८ लाख रुपये, ३१ मार्च २०२२ या दिवशी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड यांनी १ कोटी ३४ लाख रुपयांची बिलं उचलली, अशी पहिल्या टप्प्यात ३७ कोटी ७० लाख रुपयांची बोगसं बिलं उचलली.

एक रुपयाचंही काम न करता बिलं उचलली
धस म्हणाले, मोडस ऑपरेंडी समजून घ्या. कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डम्प करायचे. जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला डायव्हर्ट करायचे. ते पैसे ३१ मार्चलाच उचलण्याची गरज नाही. ते उचलले २५ जून २२ रोजी उचलले. एकाच दिवशी ३७ कोटी ७० लाख रुपये उचलले. एक रुपयाचंही काम न करता ते उचलले. माझ्याकडे कामांची यादी आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्यात दुरावा, लवकरच घेणार ग्रे घटस्फोट, नेमका काय असतो हा घटस्फोट? 

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत, जानेवारी २०२३ मध्ये ९ कामांसाठी १५ कोटी रुपये उचलण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात ६ कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याचं दाखवण्यात आलं. तर परळीतील आणखी एका कामासाठी ५ कोटी रुपये उचलण्यात आले. अशाप्रकारे, धस यांनी पूर्ण हिशोबच मांडला.

धस पुढे म्हणाले, १३ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान, म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात ३७ कोटी ७० लाख रुपये, १४ कोटी ४६ लाख रुपये, १६ कोटी २० लाख रुपये आणि ५ कोटी असे एकून ७३ कोटी ३६ लाख रुपये बोगस बिलांच्या आधारे उचलण्यात आले. ७३ कोटी ३६ लाख रुपये उचलणं ही छोठी गोष्ट नाही ना रावं, यात रकमेतून संपूर्ण जिल्ह्यात शाळा बांधून झाल्या असत्या. रस्त्यांसाठी ७३ कोटी रुपये उभारण्याचा म्हणजे काय?

धस म्हणाले, या कामासाठी संजय मुंडेंना कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले. ते डेप्युटी इंजिनियर होते. मात्र, संजय मुंडे यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचा प्रभारी चार्ज देऊन ही बिल उचलली. या संदर्भातील माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, मी त्याच्या तीन फाईल्स तयार केल्या आहेत.

 

 

follow us