Download App

फडणवीस हे खोटं बोलताहेत, त्यांच्याकडून दिशाभूल केली जातेय; सुषमा अंधारेंचा आरोप

  • Written By: Last Updated:

Sushama Andhare : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून या अधिवेशनात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून (Lalit Patil on drugs case) विरोधकांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले. ललित पाटील ड्रग प्रकरणी आमदार रोहित पवार आणि अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होता, असं वक्तव्य केलं. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) पुन्हा एकदा आरोप केला. फडणवीस हे अत्यंत खोटं बोलत आहेत, असं अंधारे म्हणाल्या.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात भाजप आमदार दोषी; तब्बल 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 

सुषमा अंधारे म्हणाल्या, ललित पाटील प्रकरणाकडे पक्षीय राजकारण सोडून गांभीर्यानं पाहावं. दोन दिवसांपूर्वी तारांकित प्रश्न अधिवेशनात विचारला होता. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली, ते दिशाभूल करत आहेत. नेक्सेस बाबतीत ते बोलले. सगळं गोलमटोल केला. ललित पाटील नाशिक मध्ये कोणाच्या आशीर्वादाने हे रॅकेट चालवत होता, हे समोर आणायला हवं. ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होता, असं फडणवीस म्हणतात. मात्र, ते धादांत खोटं बोलत आहेत. कारण ललित शिवसेनेत होता, हे सांगतांना जो फोटो व्हायरल करण्यात आला होता, त्यात दादा भुसेही दिसतात, म्हणजे दादा भुसेंनी त्यांना तिथं आणलं होतं, हे दिसतं. यावरून देवेंद्र फडणवीस अतिशय शांतपणे खोटं बोलत आहेत, असं अंधारे म्हणाल्या.

काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’; राहुल, सोनिया गांधीसह दिग्गज नेते नागपूरात 

संजीव ठाकूर हे मॅट प्रकरणामुळं बाजूला
देवेंद्र फडणवीस गेल्या अधिवेशनात अनिल जयसिंगानीया यांच्या बाबत ही गोलमटोल बोलले होते. तसंच ललित पाटील प्रकरणात घडतंय. फडणवीस याप्रकरणी ही धादांत खोटं बोलत आहे. ससूनच्या संजीव ठाकूरवर कारवाई केली अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र, ही माहिती ही चुकीची आहे. कारण संजीव ठाकूर हे मॅट प्रकरणामुळं बाजूला गेलेत. ललित पाटील प्रकरणी सरकारने कारवाई केली, म्हणून त्यांना खुर्ची सोडायला लागलेली नाही, असंही अंधारे म्हणाले

अंधारे म्हणाल्या, ललित पाटील प्रकरणी डॉक्टर संजय मरसाळे यांचा आज जामीन झाला आहे. ज्या मरसाळे यांची नोर्को टेस्टची मागणी केली जाते, त्यावेळी त्यांना जामीन कसा काय मिळतो? याचा अर्थ जाणीवपूर्वक हे प्रकरण कमकुवत केलं जातंय का? असा सवालही त्यांनी केला.

देवेंद्रजी आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यात कारागृहाच्या बाजूला दोन पोलीस काहीतरी पुरवत होते. आधी हा व्हिडीओ पुण्यातील नाही, असं सांगण्यात आलं. नंतर नाथा काळे आणि सुरेश जाधव हे दोघे कैद्यांच्या गाडीसोबत होते, हे पुढं या व्हिडीओमुळेच स्पष्ट झालं. हेच दोघे ललित पाटील प्रकरणात निलंबित झालं. मग हे दोघे कारागृहालगत काय करत होते, कसली पाकीट ते पुरवत होते? याचं उत्तर द्या, असंही अंधारे म्हणाल्या.

Tags

follow us