नीलम गोऱ्हेंच्या एन्ट्रीने तानाजी सावंतांची खुर्ची धोक्यात: आरोग्य मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार?

मुंबई : विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना (UBT) आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील जवळपास 4 टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे […]

Tanaji Sawant (2)

Tanaji Sawant (2)

मुंबई : विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना (UBT) आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील जवळपास 4 टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. सटरफटर लोकांमुळं मी नाराज झाले नाही, असं वक्तव्य करत त्यांनी अंधारेंवर निशाणा साधला.

https://www.youtube.com/watch?v=WOLOO9haSnE

दरम्यान, आता नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील एन्ट्रीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची खुर्ची धोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे सुषमा अंधारे यांनी वर्तविलेले भाकित. गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेत सुषमा अंधारेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ट्विट करत अंधारे म्हणाल्या, तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई, आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी अॅडव्हान्समध्ये अभिनंदन…! अशा शब्दात ट्विट करून त्यांनी नीलम गोर्‍हेंवर निशाणा साधला. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं आरोग्य मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली.

शिंदे गटात गेल्यानंतर नीलम गोर्‍हे यांनी सटरफटर लोकांमुळं मी नाराज झाले नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंवर टीका केली होती. यावरही अंधारेंनी भाष्य केलं. नीलम गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशांनंतर सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अंधारे म्हणाल्या, गोऱ्हे यांनी सटरफटर हा शब्द फक्त माझ्यासाठी नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य सैनिकांबद्दल वापरला असल्याचं सांगिलतं. आम्ही सटरफटरच आहोत, आमची सामान्य कार्यकर्ता म्हणून ताकद फारच कमी आहे. तुम्ही तरी स्वत:ला एकदा नगरसेवक म्हणून निवडून येऊन दाखवा, असं थेट चॅलेंज अंधारेंनी दिलं. सटरफटर कार्यकर्तेच एकनिष्ठ राहतात, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला.

आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं मिळवणं म्हणजे प्रगती; अंधारेंची गोर्‍हेंवर जळजळीत टीका 

दरम्यान, शिंदे गटात सामील होताच भाजपने नीलम गोऱ्हे यांना मोठं गिफ्ट दिलं. प्रवीण दरेकर यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आता मागे घेण्याचा ठराव मांडण्यात आला. दरेकर यांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता, त्याला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलं.

Exit mobile version