आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं मिळवणं म्हणजे प्रगती; अंधारेंची गोर्‍हेंवर जळजळीत टीका

आमच्यासाठी निष्ठा तर काहींसाठी पदं मिळवणं म्हणजे प्रगती; अंधारेंची गोर्‍हेंवर जळजळीत टीका

Sushama Andhare : शिवसेनेतील बंडाच्या एका वर्षानंतरही ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष जराही कमी झाला नाही. ठाकरे गटातून होणारी आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. मनीषा कायंदेंनंतर आज नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनीही शिंदें गटाची कास धरली. सकाळपासूनच नीलम गोर्‍हे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका व्यक्त केली होती. सटरफटर लोकामुळं नाराज व्हायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंना टोला लगावला. दरम्यान, आता सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) मंत्रीपद मिळणार असल्यानं नीलम गोर्‍हेंनी शिंदे गटात प्रवेश केला. आमच्यासाठी निष्ठा म्हणजे, प्रगती तर काही लोकांसाठी पद म्हणजे, प्रगती आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. (Sushama Andhare on Neelam Gorhe over from party entry)

सुषमा अंधारेंनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, नीलम गोर्‍हे पाचवेळा विधानपरिषदेच्या सदस्या आणि आता उपसभापती राहिलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या भागात त्यांना साधा नगरसेवकही निवडूण आणता आला नाही. बुलढाण्याचा मिटींगनंतर त्या पक्षाच्या चर्चेत, कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. मागील सहा महिन्यापासून त्यांच्या हाल निराळ्या वाटत होत्या. सभापती असूनही आपल्या आमदारांना त्या सभागृहात बोलू देत नसतं. शिदें गटाला जेव्हा ठाकरे गटाचे अनिल परब, सुनील प्रभु हे आमदार घेरण्याचा प्रयत्न करत, तेव्हा नीलम ताई त्यांना बोलू देत नसतं. खरंतर निष्ठा सिध्द करण्यचाची ही वेळ आहे. आमच्यासाठी प्रगती म्हणजे, निष्ठा. मात्र, काही लोकांसाठी प्रगती म्हणजे, नुसती पदं मिळणं, जळजळीत टीका त्यांनी केली.

Happy Birthday MS Dhoni: वाढदिवसाच्या निमित्त व्हायरल झालेले धोनीचे फनी व्हिडीओ 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नीलम गोर्‍हे यांनी बोलतांना सांगितलं की, शिंदेची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे जात असून हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळं पक्ष प्रवेश केला. यावर अंधारेंनी प्रत्तुत्तर दिलं.

अंधारे म्हणाल्या की, नीलम ताईंनी सांगितलं त्या कोणावरही नाराज नाहीत. याचा दुसरा सरळ अर्थ असा की, समोर संधी दिसत असेल तर ती संधी घेतली पाहिजे. आधी ठाकरे गटानं त्यांनी चार वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं उपसभापती केलं. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं त्यांना तानाजी सावंतांच आरोग्यमंत्री पद मिळणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. कदाचित त्यामुळंच त्यांनी पक्ष प्रवेश केला असेल, त्यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा, असं अंधारे म्हणाल्या.

फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम-

पत्रकारांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी अंधारेंना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला महाविकास आघाडीच्या भवितव्याची चिंता नाही. महाविकास आघाडी एकसंध आहे. चिंता आहे ते देवेंद्र फडणवीसांची. आतापर्यंत दोन तीन वेळा राज्यात शपथविधी झाला. पण, प्रत्येकवेळी मुख्यमंत्रीपदानं त्यांना हुलकावणी दिली. आता तर अजित पवार सत्तेत सोबत आहेत. आणि महत्वाची खाती अजित पवार गटाला मिळणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळं केंद्रातील भाजपने फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम केला, असं अंधारे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube