मुंबई : उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर टीका-टिपण्या करण्यात कायमच चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेसच्या सत्तासंघर्षानंतर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारे सतत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागत असतात. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अधारे यांनी निवडणूक आयोगालाही सोडलेलं नसल्याचं दिसून आलं आहे.
ज्या लोकांची संसदीय लोकशाही व श्रध्दा आहे त्यांना निवडणूक आयोगाचा निकाल हा धक्का देणारा आहे. भाजप स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरुन संसदीय लोकशाही धोक्यात आणू पाहत असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाचा निकाल हा देशासाठी धोक्याची घंटा असल्याचंही भाकीत त्यांनी यावेळी केलं आहे.
Thackeray आणि Shinde यांना एकाच वेळी शुभेच्छा का दिल्या? पंकजा मुंडे म्हणतात…
सध्या शिवसेनेसोबत जे काही घडलंय ते इतर कोणत्याही पक्षासोबत घडू शकतं. निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सदस्य नोंदणी पत्र का मागितलं होतं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आता ना मला सर्व कागदपत्रे मागितली मात्र त्याचा निष्कर्ष कुठेही लावला जात नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
Ask Kangana : ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत, कंगनाने पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
तुम्ही आधी नाव घेतल्यानंतर आता चिन्हही घेतलंय, नंतर पक्ष घेतला, तात्पुरत्या स्वरुपात दिलेलं चिन्हसुद्धा घेतलंय. स्वत:चं पोट भरल्यानंतर दुसऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा हा अधिकार नाही तर विकृत बुध्दी असल्याचा टोलाही लगावण्यास अंधारे विसरल्या नसल्याचं दिसून आलंय. दरम्यान, त्या 16 अपात्र सदस्यांची सुनावणी अद्याप पेंडिंग असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
Pathan : शाहरुखचा पठाण 1000 कोटींच्या पार
अपात्र सदस्यांच्या आधी निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता, मात्र निवडणूक आयोगाने दबावाखाली हा निकाल दिल्याचं ते म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरातून शिंदे गट आणि भाजपवर टीका-टिपण्या केल्या जात असून निवडणूक आयोगावरही ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहे. तर संजय राऊतांनी दोन हजारांत पक्षाचं नाव आणि चिन्हाचा सौदा झाल्याचा दावा केला आहे.