Thackeray आणि Shinde यांना एकाच वेळी शुभेच्छा का दिल्या? पंकजा मुंडे म्हणतात…

Thackeray आणि Shinde यांना एकाच वेळी शुभेच्छा का दिल्या? पंकजा मुंडे म्हणतात…

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) नुकतेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह असे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या टोकाला गेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये सध्या प्रचंड घमासान सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तर संघर्ष आणखीनच चिघळला आहे. परंतु, अशातच भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

भाजपच्या पंकजा मुंडे या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्त पुण्यात आहेत. त्यावेळी ‘लेटस्अप’शी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात स्व. गोपीनाथ मुंडे आणि माझेही एक वेगळं नातं आहे. मुंडे साहेबांचे शिक्षण पुण्यातच झाले आहे. तसेच मीही शिक्षणानिमित्त दहा वर्षे पुण्यातच होते. त्याचबरोबर मराठवाड्यातील आमचे नागरिक बहुसंख्येने नोकरी, शिक्षण, काम, धंद्यानिमित्त स्थायिक आहेत. त्यामुळे आमचं या सर्व नागरिकांबरोबर एक वेगळे नाते आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही शुभेच्छा देण्याबाबतच्या भूमिकेसंदर्भात पंकजा मुंडे म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने एखादी गोष्ट कमावली तर ती टिकवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात एक सामान्य माणूस, कार्यकर्ता देखील मोठ्या माणसाचा, पक्षाचा वारसा चालवू शकतो, असे दाखवून दिले आहे. त्यामळे तो वारसा टिकवण्यासाठी आणि पुढे घेऊन जाण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तर एवढ्या वर्षांचा इतिहास असलेला तसेच आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हा आपल्या हातून गेला आहे. ते दु:ख पचवण्याचे बळ उद्धव ठाकरे यांना मिळो यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube