Sushma Andhare : हमने किया तो रासलीला और लोगोने किया तो कॅरेक्टर ढिला… अंधारेंची भाजपवर टीका

मुंबई : राज्यात नुकतीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत युती झाली आहे. या युतीवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. आता भाजपच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हमने किया तो रासलीला और लोगोने किया तो कॅरेक्टर ढिला… अशा शब्दात अंधारे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. भाजपावर कडाडून टीका ठाकरे […]

Untitled Design (49)

Untitled Design (49)

मुंबई : राज्यात नुकतीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत युती झाली आहे. या युतीवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. आता भाजपच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हमने किया तो रासलीला और लोगोने किया तो कॅरेक्टर ढिला… अशा शब्दात अंधारे यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
YouTube video player
भाजपावर कडाडून टीका
ठाकरे गट हा एमआयएम सोबत देखील जाऊ शकतो असा आरोप भाजप करत आहे. या प्रश्नावर अंधारे म्हणाल्या, आशिष शेलार तसेच भाजप हे दुतोंडी लोक आहे. हमने किया तो रासलीला और लोगोने किया तो कॅरेक्टर ढिला…

रामदास आठवलेंसोबत युती केली तर भाजपवाले सांगतात आम्ही एक सामाजिक अभिसरणाचा एक प्रयोग करत आहे. तर दुसरीकडे शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती झाली तर ही काय युती नाही असं भाजपवाले सांगतात. अशा शब्दात अंधारे यांनी युतीवरील टीकेवर भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. त्या म्हणाल्या, संजय पांडेंना फोन टॅपिंग प्रकरणी जो न्याय मिळाला, जी वागणूक मिळाली तोच न्याय तिची वागणूक रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात का मिळत नाही असा सवाल अंधारे यांनी फडणवीसांना केला. रश्मी शुक्लांवर का कारवाई होत नाही. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत की नाही यापेक्षा फडणवीस हे कपटी राजकारणी आहेत यावर मी शिक्कामोर्तब केला.

प्रकाश आंबेडकरांशी ओळख वाढवेल
सुषमा अंधारेंना मी ओळखत नाही असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही. त्यांनी फक्त ओळखत नसल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांचे आणि माझ्या विचारांचा धागा एक सारखा आहे. आता आंबेडकर यांना भेटेल. त्यांच्याशी ओळख वाढवेल. तसेच आम्ही एकत्र काम करू, असं त्या म्हणाल्या.

Exit mobile version