Download App

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आवडली ‘लेट्सअप’ची मुलाखत

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare Letsupp Interview:थेट व बेधडक मुलाखतीसाठी लेट्सअपने लेट्सअप सभा (Letsupp sabha) हा कार्यक्रम सुरू केलाय. यात अनेक दिग्गज राजकारणी, वेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्यांच्या दिलखुलास मुलाखती लेट्सअप घेत असते. या मुलाखतीत अनेक जण आपल्या प्रतिस्पर्धीवर थेट राजकीय वार तर करतातच त्याचबरोबर काही गुपितही सांगत असतात.

काही दिवसांपूर्वी लेट्सअपने ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत घेतली होती. यात त्यांनी शिंदे गटाबरोबर, भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यानी त्या उद्धव ठाकरे गटात कशा आणि का सहभागी झाल्या ते सांगितले. तर त्यांच्या संकल्पातून महाप्रबोधन यात्रा राज्यात कशी निघाली हे त्यांनी सांगितले. सुषमा अंधारेंची भाषणे टोकदार असतातच, त्यांच्या मुलाखतीही तितक्याच बेधडक असतात. त्यांची लेटस्अप सभा ही मुलाखतीला प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनीही या मुलाखतीला जोरदार दाद दिली आहे. सुषमा अंधारे म्हणतात मला ज्या मुलाखती आवडल्या, त्यात लेट्सअप सभेतील मुलाखत आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर हे जाहीर केले आहे

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेल्या राजकीय नेत्यांच्या स्फोटक मुलाखती लेटसअप सभेत झाल्या आहेत. त्यात अनेक नवीन राजकारणातील बाबी उघडकीस आल्या आहेत. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, भाजप नेते आणि आमदार राम शिंदे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे, युवा नेते सत्यजित तांबे यांच्याही दिलखुलास मुलाखती झाल्या आहेत. लेट्सअपमधील सर्व सहकारी या नेत्यांना बोलते करतात. या मुलाखतींना लाखोंनी व्हूज मिळाले आहेत.

राजकारणाबरोबर आम्ही समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या व्यक्तींचा जीवनपटही उलगडत असतो. आदर्श गाव हिवरेबाजारच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी लेट्सअप सभेच्या माध्यमातून संवाद साधला आहे. या पुढे आम्ही राज्यातील राजकारणी, वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या दिग्ग्जांच्या मुलाखती प्रेक्षकांसाठी घेऊन येणाj आहोत.

Tags

follow us