Download App

तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?

धाराशिव : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi)सत्तेत आल्यानंतर 2019 च्या पुढे सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या. मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम सुरु होतं. हे सांगून करत होतं. झाकून करत नव्हतो, उघड माथ्यानं आपण करत होतो, असं ठणकावून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, तुम्ही ऐकलं असेल की, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. ते धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

राज्याचे आरोग्यमंत्री यांनी धाराशिवध्ये उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 30 डिसेंबर 2019 ला महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. 3 जानेवारीच्या दरम्यान मी स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पहिल्यांदा बंडखोरी करुन धाराशिवच्या जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन केली. त्यावेळीच बंडाचं निषाण फडकावलं होत. तेवढ्यावरच न थांबता ज्यांना इशारा द्यायचा होता त्यांना त्याचवेळी दिला होता असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

भगतसिंह कोश्यारींकडून महापुरुषांचा अवमान? न्यायालयाचा मोठा निर्णय

तानाजी सावंत म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये जनतेनं शिवसेना-भाजप युतीला 180 च्या पुढे जागा निवडून दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे तत्त्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून आम्ही संपूर्ण राज्यभर मतं मागितली. त्यानंतर या जनतेनं शिवसेना-भाजपला कौल दिला. सत्ता स्थापनेसाठी होकार दिला, ही सत्यस्थिती आहे.

त्यानंतर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राचे जानता राजा, संपूर्ण भारत देशाला वेड लावलं होतं, त्यांना माहिती होतं की यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकल्याशिवाय ही युती काय तुटणार नाही. असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यानंतर 2019 मध्ये जे चित्र तुम्ही पाहिलं, त्या चित्रातला आमचे तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सल्ला देणारा महाराष्ट्रातला पहिला शिवसैनिक आणि आमदार तानाजी सावंत होता. मी त्यांना त्याचवेळी सांगितलं होतं की, साहेब यांच्या नादाला लागू नका, यांच्या नादाला लागाल तर आत्मघात ठरेल, पक्षाचं वाटोळं होईल, हा निर्णय घेऊ नका. कदाचित हा सल्ला दिल्यामुळे तत्कालिन आमच्या पक्षप्रमुखांनी मला त्यावेळच्या मंत्रिमंडळातून बाजूला केलं.

follow us