Download App

शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर गेली… तावडेंचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : 2014 मध्ये भाजपा व शिवसेना युती ही कायम होती मात्र 2019 मध्ये या युतीत फूट पडली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे व फडणवीसांचे सरकार आले. मात्र उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याने भाजपनेते विनोद तावडे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर गेल्यानं येत्या काळात त्यांना निवडणुकीत मतदानामध्ये फटका बसेल असा दावा भाजपनेते विनोद तावडे यांनी केला.

नवाब मालिकांची कन्या अजित पवारांच्या भेटीस, ‘या’ विषयवार झाली चर्चा

विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच येत्या काळात भाजपाची निवडणूक रणनीती काय असेल याबाबत भाष्य केले आहे. यावेळी बोलताना तावडे म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणूक मध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढले. त्यावेळी भाजपाला 29 टक्के मत होती, शिवसेनेला 19, राष्ट्रवादीला 17 , काँग्रेसला 18 टक्के मत होती. दरम्यान यामध्ये आपण पहिले तर शिवसेनेच्या एकूण टक्केवारीमध्ये 9 ते 10 टक्के मते ही हिंदुत्वाची होती.

‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही

शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर गेली, तसेच हिंदुत्वाला विरोधी करणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेली यामुळे शिवसेनेला की काही मत मिळाली ती मत येत्या काळात वेगळी होऊ शकतात. व ही मत येत्या काळात भारतीय जनता पार्टीला मिळाली तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली तर एकदम आम्ही 38 ते 39 टक्क्यांवर जाऊ असे यावेळी विनोद तावडे यांनी म्हंटले आहे. तसेच काँग्रेसला मतदान करणारी काही 4 ते 5 टक्के मत देखील आमच्याकडे आली तर एकदम भाजपा 44 ते 45 टक्क्यांपर्यंत जाईल. यामुळे येत्या काळातील निवडणुकांमध्ये तुम्हाला वेगळे चित्र पाहायला मिळेल.

Tags

follow us