KCR : तेलंगणातील गुलाबी वादळ अखेर महाराष्ट्रात सज्ज; नांदेडमधील मोंढा मैदानात 5 फेब्रुवारीला जाहीर सभा

नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या […]

KCR and Bharat Rashtra Samiti along with 288 party offices and 2 lakhs workers active in Maharashtra

K Chandrashekhar Rao

नांदेड : तेलंगणातील सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची ही तेलंगणा (Telangana) बाहेर पहिलीच सभा असणार आहे. ( Politics ) या अनुषंगाने नांदेडमध्ये मोंढा मैदानाची पाहणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या सभेच्या तयारीसाठी तेलंगणाचे ४ आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. शिवाय विविध नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेणे सुरू केले आहे. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची भेट घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. नांदेडच्या सभेत अनेक नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाच्या या आमदारांकडून करण्यात येत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली आहे. केसीआर यांचा पक्ष आधी तेलंगाणा राष्ट्र समिती पुरता होता. त्याचंच नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती ( Bharat Rashtra Samithi) केले आणि राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेत आहेत.

तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दलित, ओबीसीसह इतर मागास समाजांवर केसीआर यांच्या पक्षाची मदार आहे. तेलंगाणात हाच मतदार काँग्रेसबरोबर होता आणि आता तोच मतदार बीआरएससोबत आहे. महाराष्ट्रात असंच काहीसं होणार का ? की महाराष्ट्रातील सभांच्या आड केसीआर यांचा आणखी काही प्लॅन आहे हे लवकरच समजणार आहे.

Exit mobile version