Download App

NCP शी युती नाही म्हणतात अन् पहाटे, दुपारी दोनवेळा लव्ह मॅरेज; ‘देवा’भाऊ म्हणत अंधारेंनी जुनं उकरुन काढलं

Sushma Andhare On Devendra Fadnvis : देवाभाऊ म्हणतात, राष्ट्रवादीशी युती नाही-नाही अन् पहाटे, दुपारी दोनवेळा पळून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जुनं उकरुन काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना घेरलं आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

Video : अयोध्येत भक्तांच्या गर्दीपुढे सुरक्षेचे तीन तेरा; अलोट गर्दी नियंत्रणासाठी नियमावली जारी

सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, देवाभाऊंना याचा विसर पडला आहे, देवेंद्र फडणवीस सांगतात की, राष्ट्रवादीशी कधीही युती नाही, नाही, नाही… हा आपला शाश्वत धर्म नाही. अन् पहाटे, दुपारी दोनवेळा पळून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करतात, त्यांनी जरा एकवचनीची व्याख्या समजून घ्यावी, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे.

राष्ट्रवादीत उभी फुट पडण्याआधीच भाजपकडून राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याची भूमिका होती. अजित पवार गट सत्तेत सामिल होत असताना देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ माध्यमांमध्ये जोरदार व्हायरला होत होता. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीशी युती करणार नाही नाही नाही… असं ठामपणे सांगत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुन आता सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच सुनावलं आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलार्ट मोडवर… उद्यापासून ‘मिशन सर्वेक्षण’ मोहिम

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पॉलिटिकल भाजपसाठी टूल कीट :
राम आमच्या अस्थेचा श्रद्धेचा विषय पण काल भाजपने पॉलिटीकल टूल कीट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला आनंद राम हे एकवचनी, एकबाणी, एकपत्नी अशी त्यांची व्यक्तीरेखा आहे. काल आम्ही पाहिलं की बाकी नेते एकटेच तुरूतुर जात होते, त्यांची पत्नी वणवासात. याचं वाईट वाटतं. रामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरे हेच शोभतात, उद्धव ठाकरे दर्शनाला गेलेत तेव्हा ठाकरेंनी सन्मानाने महिला म्हणून रश्मी वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाहीत. ठाकरेंनी वहिनींना सगळे अधिकार दिले असल्याचं अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल कीटसारखा केला त्यांना मुळात एकवचनी असल्याचं कळलंच नाही. राम एकवचनी होते पण भाजपवाल्यांचा नेता 72 तासात विसरतो की 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यालाच परत घेतो, असं म्हणत अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केलीयं.

follow us