Video : अयोध्येत भक्तांच्या गर्दीपुढे सुरक्षेचे तीन तेरा; अलोट गर्दी नियंत्रणासाठी नियमावली जारी

  • Written By: Published:
Video : अयोध्येत भक्तांच्या गर्दीपुढे सुरक्षेचे तीन तेरा; अलोट गर्दी नियंत्रणासाठी नियमावली जारी

Guideline Issue For Ayodhya Ram Mandir Darshan : अयोध्येत काल (दि.22) मोठ्या आनंदात रामाची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir) करण्यात आली. त्यानंतर आजपासून (दि.23) सर्वसामान्यांना रामांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले आहे. रामाचं दर्शन घेण्यासाठी करोडो भक्त (Devotees) अयोध्येत दाखल झाले असून, या सर्वांना नियंत्रित करताना पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची धांदल उडत आहे. त्यामुळे जमलेली गर्दी लक्षात घेता आता रामाच्या दर्शनासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणात रहावी आणि भक्तांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते तरी कुठे ?

जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार दर्शनासाठी वयोवृद्ध आणि महिलांना प्राध्यान्य दिले जाणार आहे. सध्या अयोध्येत कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीतही देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो भक्ता रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. गर्दी नियंत्रित राहावी यासाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे.

मात्र, असे असतानादेखील जमलेल्या अलोट गर्दीपुढे पोलीसांना या सर्वांना नियंत्रण ठेवणे कठिण झाले आहे. अनेकजण सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेटिंग तोडून दर्शानासाठी जात असलेले समोर आलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे वाढती गर्दी आणि सुरक्षेचा विचार करता येथून पुढे रामाच्या दर्शानासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार दर्शनासाठी महिला आणि वयोवृद्धांना प्राधान्य दिले जाणार आहे.

रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण

कसे असणार रामाचे नित्योपचार?

दररोज पहाटे तीन वाजता पूजा आणि श्रृंगार सजावट त्यानंतर 3.30 वाजता श्रीरामाची काकड आरती केली जाणार आहे.  3.30 ते 4 यावेळेत अभिषेक आणि श्रृंगार नैवेद्य दाखवला जाणार आहे. तर, यानंतर पहाटे 4.30 वाजता श्रृंगार आरती केली जाणार आहे. हे सर्व नित्योपचार पार पडल्यानंतर सकाळी 8 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वसामान्यांना दर्शनासाठी मंदिर खुलं असेल. दुपारी 1 वाजता नैवेद्य आरती केली जाईल. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत दर्शन मंदिर बंद ठेवले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती आणि दहा वाजता मंदिराचे द्वार दर्शनासाठी बंद केले जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube