Ram Mandir: बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण, कारसेवकांच्या त्यागाचं सोनं; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
Ram Mandir: बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण, कारसेवकांच्या त्यागाचं सोनं; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, राम मंदि (Ram temple) उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी या सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राम वाद नव्हे तर, समाधान! फक्त विचार बदलण्याची गरज; प्राणप्रतिष्ठापना होताच मोदींनी टोचले विरोधकांचे कान 

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. या सोहळ्याची जोरदार तयारीही करण्यात आली होती. देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाची निमंत्रणे पाठवण्यात आली. अखेर आज हा सोहळा पार पडला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक ट्विट करत लिहिलं की, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीता राम! हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोन झालं! प्रभू श्रीरामचंद्राचा विजय असो! जय सिया राम!, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Ramayana: रामायणावर आधारित देशातील ‘या’ चित्रपटावर बंदी घालावी लागली, नेमकं प्रकरण काय? 

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिलं की, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!, अशी पोस्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये कली आहे. यावेळी राज ठाकरेंनी रामललाच्या मूर्तीची व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही गर्भगृहात उपस्थित होते. या सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागातून अनेक मान्यवरही अयोध्येत दाखल झाले होते.

दरम्यान, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्यानं देशातील कोट्यवधी भाविकांनी घरबसल्या प्रभू रामाचे दर्शन घेतले. हा सोहळा आज दिवसभर सुरू राहणार असून राम मंदिर बुधवार 24 जानेवारीपासून सर्व राम भक्तांसाठी खुले होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube