संजय दिना…ठिकाण, वेळ तुम्ही सांगा, मी निशस्त्र येईल; सुषमा अंधारेंचं ओपन चॅलेंज

संजय दिना पाटील तुम्ही ठिकाण वेळ सांगा, मी निशस्त्र यायला तयार असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी ओपन चॅलेंज दिलंय.

sushma andhare

sushma andhare

Sushma Andhare On Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) तुम्ही ठिकाण वेळ सांगा, मी निशस्त्र यायला तयार असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ओपन चॅलेंजच दिलंय. ठाकरे गटातून बंडखोरी करीत खासदार संजय दिना पाटील यांनी ‘ऑपरेशन तुडवा’वरुन बंदुकीची अॅक्शन करीत विरोधकांना इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांनी संजय दिना पाटलांना चॅलेंजच दिलंय. अंधारे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, संसदीय दलाच्या बैठकीनंतर संजय दिना पाटलांचा उल्लेख केला होता. तेव्हा संजय दिना यांची भिजलेली मांजर झाली होती. त्यावेळी त्यांनी अरविंद सावंत, संजय राऊतांना फोन केला. मी तुमच्यासोबतच असल्याचं सांगत संजय दिना यांनी वेळकाढूपणा केला आहे. मी तेव्हाही सांगत होते की. संजय दिना बदमाश आहे. परंतू जशी तुमच्याकडे वाय प्लस सुरक्षा आली तेव्हा तुम्हाला दातं आले, तुम्ही पलटले, भाषेत मगरुरी आली, असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. संजय दिना पाटील यांची मगरुरी, बदलेली भाषा, तुमच्या भोवती असलेल्या वाय प्लस सुरक्षेमुळे आहे. आमच्याकडे काहीही नसताना ताठ मानेने बोलतो आहे. तुम्ही तुमची सुरक्षा सोबत ठेवा अन् ठिकाण सांगा, वेळही तुम्हीच ठरवा, सुषमा अंधारे निशस्त्र यायला तयार असल्याचं थेट चॅलेंजच अंधारे यांनी दिलं आहे.

खासदार निधी खर्चात नीलेश लंकेंचेही हात रिकामे ! 14.70 कोटी मिळाले पण खर्च किती ?

तसेच संजय दिना पाटील तुमच्या बंदुकीत प्रचंड गोळ्या आहेत. गोळ्या मारायची तुम्हाला सवय आहे, तुम्ही चार-पाच मर्डर केलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे की, तुम्ही ऑनइयर काय काय करु शकता, तुम्ही किती मर्डर केलेले आहेत. हे तुम्ही ऑनइयर सांगितलं. आम्हालाही कळलं की भाजपला गुन्हेगार लोकांची किती गरज आहे. भाजपने जे टेस्ट ट्यूब बेबी म्हणून जन्माला घातलेले आहेत त्यांच्याकडे किती गुन्हेगार लोकं आहेत. पण तुमच्याकडे किती बंदुका आणि गोळ्या असल्या तरीही चालवण्याची धमक आहे की नाही हे आम्ही ओळखून असल्याचाही टोला अंधारे यांनी लगावलायं.

काय म्हणाले होते खासदार संजय दिना पाटील?
माझ्या नादाला लागाल तर एक तर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल नाही तर स्मशानात. माझ्या वडिलांच्या वेळी असाच प्रसंग घडला होता. त्यावेळी आम्ही पाच जणांना मारलं होतं. आम्हाला पोलिसांच्या सुरक्षेची गरज नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, असे सांगत संजय दिना पाटील यांनी बंदुकीची ॲक्शन करत ‘ऑपरेशन तुडवा’च्या तयारीत असलेल्या आपल्या विरोधकांना इशारा दिला होता.

Exit mobile version