Download App

Sushma Andhare : पोल्ट्री फार्म ते खासदारकी; सुषमा अंधारेंनी राणेंचा इतिहासच काढला

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.

Sushma Andhare On Narayan Rane : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळ्याचं समोर आलंय. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार ते घाईगडबड केल्याचा सूर विरोधकांकडून आवळण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलायं. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा पोल्ट्री फार्म ते खासदाराकीपर्यंतचा सगळा इतिहासच सांगितलायं. त्या पुण्यात बोलत होत्या.

BB Marathi : अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला? घरातल्या सदस्यांनी निक्कीकडे का दाखवलं बोट?

सुषमा अंधारे म्हणाल्या, नारायणराव आम्हाला तुमचा पोल्ट्री फार्मपासूनचा इतिहास चांगलाच माहित आहे, तुम्ही कणकवलीला गुन्हेगारांचा आखाडा केला असून श्रीधर नायकांच्या हत्येचा मुख्य आरोपी तुम्ही होता. सत्यजित भिसेची कणकवलीत हत्या झाली, त्याचाही आरोप तुमच्यावर होता. त्यानंतर राणेंचे चुलत भाऊ अंकुश यांचा मृतदेह सिंधुदूर्गला विकृत अवस्थेत मिळाला होता, हा तुमचा संपूर्ण इतिहास असल्याची खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केलीयं.

राणे धमक्या देतील असं वाटत नाही, त्यांची बोलण्याची पद्धतच…; मालवण राड्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

तसेच मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या याने घोटाळा काढून तुमच्या मागे लावली होती. तेव्हा तुम्ही सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करीत होता. तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे, श्रीधर नाईक, अंकुश राणे यांना तुम्ही भरल्या ताटावरून उठवले असल्याचीही टीका अंधारे यांनी केलीयं.

राणेंना भुंकल्याशिवाय किंमत मिळत नाही…
नारायण राणे तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नसून आम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारायचे आहेत. कारण नितेश राणे म्हणतोय आमचा बाप सागर बंगल्यावर आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

रविवारी सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन; ठाकरे-राणे वादानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा

…तर राणेंनी थयथयाट केला असता :
खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांचा मुजोरपणा देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्त शिवाय नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शांत राहून द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील लेखीबाळी सुरक्षित ठेवायचा नाहीत. जयदीप आपटे च्या ऐवजी जावेद असता तर नितेश राणेने काहीतरी थयथयाट केला असता. बदलापुर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या ऐवजी अक्रम शेख असता तर नितेश राणेंनी काय थायतायाट केला असता? असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावलायं.

follow us