BB Marathi : अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला? घरातल्या सदस्यांनी निक्कीकडे का दाखवलं बोट?

BB Marathi : अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला? घरातल्या सदस्यांनी निक्कीकडे का दाखवलं बोट?

Bigg Boss Marathi New Season Day: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Season ) सदस्यांची रुपे कोणत्याही क्षणी बदलताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर (Bigg Boss Marathi ) नाव कोरण्यासाठी सदस्य नवा प्लॅन बनवताना काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आपली खेळी किती उत्तम आहे हे दाखवण्याचा सदस्यांचा प्रयत्न आहे. निक्की (Nikki) आणि अभिजीतची (Abhijit) जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आता अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Promo) सदस्यांना दिलेल्या जोड्यांमध्येच फिरण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. पण अभिजीत सावंत (Abhijit Sawant) एकटा फिरत असल्याने सूरज त्याला म्हणतोय,”अभि दादा आत बस”. अभिजीतला छोटा पुढारी म्हणतोय,”जोडीशिवाय फिरू शकत नाही”. त्यावर अभिजीतने थेट सुनावले आहे की,” मला बोलतील बिग बॉस’. त्यावर घन:श्याम म्हणतो,”पण तुम्ही नियम मोडू नका”. तर आर्या देखील अभिजीतच्या हालचालीवर म्हणते की, “तुम्ही तुमचे शब्द बोलताय की निक्कीचे. दोन दिवसांत अभिजीत सावंत पू्र्णपणे बदलला आहे”. निक्की अभिजीतला पुढे म्हणते,”मी तुला चार दिवसांत ओळखू शकते तर ते ओळखू शकत नाहीत का?”.

अभिजीत सावंतने खरचं नियम मोडला आहे का? अभिजीत सावंतला आता बिग बॉस काय शिक्षा देणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व प्रेक्षकांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.

सोन्याची नाणी शोधायला, कोण कोणावर पडणार भारी?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कमाल टास्क पार पडणार आहे. प्रोमोमध्ये म्हटलं जात आहे,”पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी”. दरम्यान टास्कमध्ये अरबाज आर्याला म्हणतोय,”आर्या आपले कमी आहेत..लवकर नाणी आण”. दरम्यान कॅप्टन निक्की मात्र टीम B ची नाणी वॅलिड नाही असं म्हणते. यावर डीपी दादा म्हणतात,”खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर”. तर अभिजीत म्हणतो,”यापुढे मला पार्टनर बनयाचं नाही”.

Bigg Boss Marathi: सगळे जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?

अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला सोडलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube