Download App

कोळी-राणेंमध्ये धुमश्चक्री; ‘नित्या’ अन् ‘निल्या’ म्हणत वाभाडेच काढले…

Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ठाकरेंच्या सभेला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं जाहीर केलं आहे. सोबतच नितेश राणेंनी सडकून टीकाही केली आहे. नितेश राणेंच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शाहिदच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका; रिलीजआधीच केली…

शरद कोळी म्हणाले, नितेश अन् निलेश राणेंची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर त्यांचे थोंड ठेचल्यासारख वाटत होतं. उद्धव ठाकरेंच्या सभाच अशा झाल्या की त्यांच्या बु… बुडबुड्या आल्या आहेत. तुम्ही ठाकरेंची डीएनए टेस्ट करायला निघालात. नित्या अन् निल्या तुमची थोबाड कुणासारखी आहेत. मातोश्रीत काम करणाऱ्या थाप्यासारखे तुम्ही दिसता..अपघातात जन्मलेले नितेश आणि निलेश राणे नेपाळी अवलाद असून तुमची लायकी काय आहे? तुम्ही असं बोलता आहात. बेवड्या अवलादींनो नित्या अन् निल्या तुम्ही सांगा तिथं येतो नाही तुझं थोबाड फोडलं तर नावं शिवसेनेचं नाही लक्षात ठेव, असा इशाराच शरद कोळी यांनी राणे बधूंना दिला आहे.

तसेच तू काय भास्कर जाधवच्या नादी लागतो ते स्टेजवर चढले की तुझा धुराळा होईल. उद्धव ठाकरे साहेब येऊन गेले तर तुम्ही खुडूक कोंबडी झाले आहात. तुझी डीएनए टेस्ट करना तू कोणाची अवलाद आहे. तुम्ही नारायण राणेची अवलाद आहात का? तुम्ही नेपाळमध्ये पैदा झाला आहात. महाराष्ट्राचं राजकारण नासवत आहात.
राणेला शिवसैनिकांनी चेमटलं आहे. कणकवली तुझ्या बापाच्या नावावर आहे काय…साहेब आलते तेव्हा कुठं बिळात लपला होता? असा सवाल करत शरद कोळी यांनी हल्लाबोल चढवला आहे.

नितेश राणे काय म्हणाले?
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला आळशी कसं बनवलं ह्याचं उत्तम विश्लेषण मोदींनी केलं. त्याची मिरच्या काँग्रेसच्या कामगाराला झोंबल्या. तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यात मोदींचं कौतुक करत आहे. उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून भाजपासोबत येण्यासाठी आतुर आहे की नाही ते सांगावं. तुझा मालक आणि मालकीण वंदे भारतने मुंबईला गेले. ती मोदींजींची देण आहे. आम्हीही कोकणात भास्कर जाधवांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्याचं नितेश राणे म्हणाले होते.

follow us

वेब स्टोरीज