Vijaykumar Gavit तुमचं डोकं भंगार, लाज लज्जा…; ‘त्या’ विधानावर शरद कोळी भडकले

Vijaykumar Gavit तुमचं डोकं भंगार, लाज लज्जा…; ‘त्या’ विधानावर शरद कोळी भडकले

Sharad Koli on Vijaykumar Gavit : मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘माश्यांमुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर, नियमित खाल्यास बाईमाणूस पण चिकनी दिसते : मंत्री गावितांचं वक्तव्य

काय म्हणाले शरद कोळी?

गावित यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी म्हणाले की, गावित महाराष्ट्रातल्या मुली मासे खाऊन दुसऱ्या मुलाला पाटवायला निघाल्या. तर तुमच्या बुडाला आग लागायला नको. महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फसन्याच काम भाजपच्या गावितसारखी माणसं करतात. लोकांच्या आया बहिणी रस्त्यावर पडल्यात का? अशा अवलादीनचा हात कलम करण्याचं काम शिवसेनेच्या स्टाईलने केला जाईल. असं म्हणत त्यांनी गावित यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Yaariyan 2: मैत्री- प्रेमासह उलगडणार नवी नाती; ‘यारिया 2’चं टीझर प्रदर्शित

काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्ले तर तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील. असा सल्ला शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात दिला. धुळे येथील मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होत्या.  त्यांच्या या अजब सल्ल्याची सध्या राज्यभरात चर्चा होतं आहे.

‘डोळ्यांना माशाचा फायदा होतो’

विजय कुमार गावित म्हणाले मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. कोणी ऐश्वर्या राय बघितली का? ऐश्वर्या राय ही बेंगलोरमध्ये समुद्राच्या किनारी राहायची. ती दररोज मासे खायची, तिचे डोळे बघितले की नाही, तसे तुमचे पण होणार. माश्यांमुळे आपली जी स्कीन असते, कांती असते, चांगली दिसते, त्यात ऑईल असते, तेल असते, त्यामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची स्कीन चांगली दिसते, असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ते भाषण करत असतानाही अनेकांनी अस्वस्थता व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube