Yaariyan 2: मैत्री- प्रेमासह उलगडणार नवी नाती; ‘यारिया 2’चं टीझर प्रदर्शित

Yaariyan 2: मैत्री- प्रेमासह उलगडणार नवी नाती; ‘यारिया 2’चं टीझर प्रदर्शित

Divya Khosla Kumar Movie: २०१४ मध्ये, दिव्या खोसला कुमारने तिच्या यारियां सिनेमाने कॉलेज रोमान्सची परिभाषा बदलली. (Yaariyan 2 Movie Teaser Out) आता २०२३ मध्ये त्याच्या ‘यारियां 2’ (Yaariyan 2) या सिनेमात चुलत भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधातील अप्रतिम गोडवा दाखवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya khosla (@divyakhoslakumar)


राधिका राव आणि विनय सप्रू यांचा म्युजिकल परफॉर्मन्स दाखवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये कुटुंबातील मित्राचा आणि मित्रातील कुटुंब याचा अप्रतिम गोडवा दाखविण्यात आला आहे. ‘यारियां 2’ प्रेम, भावना आणि मैत्री नव्याने दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

हा सिनेमा उत्तम संगीतासह ड्रामा, इमोशन आणि कॉमेडी यांचे संपूर्ण गोडवा आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये ‘सनी सनी’ या गाण्याचे देखील नवीन व्हर्जन चाहत्यांना बघायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असल्याचे दिसत आहे.

राधिका आणि विनय यांची नवीन ऑन-स्क्रीन जोडी यश दासगुप्ता, वारिना हुसैन, अनस्वरा राजन आणि प्रिया वारियर यांना चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. भवनदानमधील प्रेम चाहत्यांना नक्कीच आवडेल आणि सिनेमाशी जोडले जातील असे निर्मात्यांनी यावेळी सांगितले आहे. चुलत भाऊ-बहीण यांच्यातील बंध आणि मैत्री यांचे सिनेमात खूप छान वर्णन करण्यात आल्याचे बघायला मिळणार आहे.

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

‘यारियाँ 2’ मध्ये दिव्या खोसला कुमार, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, मीझान जाफरी, वारिना हुसैन, प्रिया वॉरियर आणि पर्ल व्ही पुरी यांच्या भूमिका आहेत.  या सिनेमाचा टीझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला आहे २० ऑक्टोबर २०२३ दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष माहेश्वरी यांनी निर्मित केली आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube