Download App

मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी ‘ही’ दोन नाव सुचवली होती; भुजबळांचा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवसेनेतून बंडाळी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडाळीच कारण शिवसेनेनं सोडलेलं हिदुत्व सांगितलं जातं. शिवसेनेतील या बंडाळीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं. आता सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. अशातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी दोन नाव सुचवली होती, असं भुजबळ म्हणाले.

2019 ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं की, तुम्ही मुख्यंत्री व्हा. मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंनी दोन नावं मुख्यमंत्रीपदासाठी सुचवली होती. एक नाव होतं सुभाष देसाई यांचं, आणि दुसरं नाव होतं एकनाथ शिंदेचं. पण, नंतर ही नाव मागे पडली. आणि स्वत: उध्दव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हावं लागलं. कारण, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असा सांगितलं. तुमच्या मंत्रिमडळात अनेक सिनिअर नेते, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तुम्हीच मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळ, अशी गळ पवार साहेबांनी ठाकरेंना घातली. त्यामुळे ठाकरेंनी सीएमपद स्वीकारलं.

मते ट्रान्सफर झाली पाहिजेत….अशोक चव्हाणांनी थेट सांगितले

काल महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी भुजबळांनी हा खुलासा केला. काल झालेल्या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यंना आपापल्या भूमिका मांडल्या. तसेच आगामी निवडणूक स्ट्रॅटेजीवर चर्चा झाली. भाजपनं संविधान धोक्यात आणलं, त्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. मात्र, जरा विरोधात बोललं की, दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणां दाखल होतात. विरोधकांना अडचणीत टाकण्याचं काम केलं जातं. आणि हे केवळ सुडभावनेनं केलं जातं. मात्र, लोक झोपी गेलेली नाहीत. त्यांना तुमच्या कारवायामागचं राजकारण कळतं, आगामी निवडणुकीत सामान्य मतदार याचा नक्कीच बदला घेईल, असा इशारा भुजबळांनी दिला.

दरम्यान, यावेळी भुजबळांनी वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. महिलांना प्रवासात सवलत दिल्यापेक्षा त्यांना गॅसवर 600 रुपये अनुदान दिलं तर मग महिला तुमच्याबरोबर येतील, असं ते म्हणाले.

Tags

follow us