Eknath Shinde : आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होतो. तेव्हा ते निवांत घरी होते. आता आम्ही सर्वच बाहेर पडलो आहे. आता मी सर्वांनाच कामाला लावले आहे म्हणून ते आता रस्त्यावर उतरत आहे. चांगली गोष्ट आहे. उशिरा का होईना ते घराबाहेर पडत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. माझी धास्ती घेतली असे मी म्हणणार नाही. पण माझ्यामुळे घरात बसणारे आता रस्त्यावर उतरले आहेत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्यापासून तीन दिवसांचा आयोध्या दौरा सुरु आहे. त्यांच्याबरोबर ५० आमदार आणि १२ खासदार हेही आय़ोध्या दौऱ्यात असणार आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची एक विशेष रेल्वे ट्रेन आज रवाना झाली आहे.
Chandrapur News : मुलगा आमदार… आई विकते बांबूच्या टोपल्या… – Letsupp
आयोध्या दौऱ्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून एक विशेष ट्रेन शुक्रवारी रवाना झाली. या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यासाठी अयोध्या श्रद्धा, अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही आधी सांगितले तसे आयोध्या दौरा नियोजित असून उद्यापासून आम्ही जात आहोत. परंतु, माझ्या या दौऱ्यामुळे जर काही लोकं घरातून बाहेर पडू लागली असेल तर चांगलेच आहे.
गेली अडीच वर्षे घरात बसून कारभार करणारे आता जागे झाले आहेत. त्यांना आता लोकं आठवायला लागली आहेत. आता ते लोकांच्या प्रश्नावर बाहेर पडत आहेत. आम्ही त्यांना तेव्हाच म्हणत होतो. बाहेर पडा पण दुर्लक्ष करत होते. मात्र, आता ते खडबडून जागे झाले आहेत. माझ्या आयोध्या दौऱ्यामुळे हे होत असेल तर स्वाहत आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.