सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. सध्या लंच ब्रेकसाठी कोर्ट थांबलं आहे, ब्रेकनंतर पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करतील.
हेही वाचा : Arvind Sawant : दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा.., ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका
आजच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून याच आठवड्यात युक्तिवाद संपण्याचे संकेत दिले आहेत. आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आजच लंच ब्रेकनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद पुन्हा सुरु होणार आहे. गुरुवारी थोडा वेळ रिजाँईडरसाठी ठाकरे गटाला मिळणार आहे.
आज शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तीवाद करतील. त्यानंतर उद्या नीरज कौल युक्तिवाद करतील. गुरूवारी युक्तीवाद संपवा असा कोर्टाचा सल्ला दिला आहे. यावर ठाकरे गटानं साडे तीन दिवस युक्तीवाद केला आहे. आम्हाला पण वेळ द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी कोर्टाकडे केली आहे.
ठाकरे गटाकडून आज सकाळी अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद सुरु केला. त्यांनतर ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. कामत यांच्याकडून राजकीय पक्ष आणि प्रतोद यांच्या अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला.
Senior Advocate Kamat concludes his submissions. The bench has risen for lunch. Senior Advocate NK Kaul will commence his arguments on behalf of the Shinde faction at 2 pm.#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) February 28, 2023
https://www.youtube.com/watch?v=1CEsYH5fDWk