Arvind Sawant : दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा.., ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका

Arvind Sawant : दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा.., ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका

नागपूर : पक्षाचा द्रोह करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा पक्षद्रोहच असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीय. खासदार अरविंद सावंत नागपूरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

Post on Chandrakant Patil : ‘दडपशाहीचे साधन म्हणून कायद्याचा वापर करू नका ! हायकोर्टाचा पुणे पोलिसांना दणका

खासदार सांवत म्हणाले, निवडणूक आयोगाला भाजपकडून आलेल्या स्क्रिप्टवर निर्णय दिला आहे. जे अनिल गोयल नोव्हेंबरच्या अखेरीस निवृत्त होणार होते त्यांना भाजपने 29१९ नाव्हेंबरला निवडणूक आयोगाचा आयुक्त करुन टाकलं. हे विकाऊ लोकं आहेत. आम्हाला तुम्ही हे द्या आम्ही तुम्हाला ते देतो, या शब्दांत त्यांनी भाजपलाही सोडलेलं नाही.

जर दोन तृतीयांश सदस्य पक्ष सोडून गेले तर ते गट तयार करु शकत नाहीत. जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांना कोणत्याही पक्षात विलीन व्हावं लागतं. निवडणूक आयोगाने 50 मधून 40 आमदार बाहेर पडल्यांने त्या 40 आमदारांच्या मतांचा काऊंट करुन निकाल दिल्याचं सांगितलंय. मात्र, बाहेर पक्ष राजकीय असतो आतमध्ये तो विधीमंडळ पक्ष असतो.

वयाच्या 46 वर्षीही इतकी ग्लॅमरस दिसते चित्रांगदा

राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने 124 जागा लढविल्या आहेत. त्यातील 56 जागा आम्ही जिंकलो, तर बाकीचे जे विधानसभेत निवडणूकीत पराभूत झाले आहेत. त्यांना मिळालेल्या मतांचं काय? ते मत का गृहीत धरले नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उपस्थित केला आहे.

तसेच आमच्या पक्षाच्या चिन्हावरच सर्वच निवडणुका लढविल्यात. ते दोन्ही मते कोणाची आहेत, असंही त्यांनी म्हंटलय. आपल्या पक्षाचा द्रोह करण्यासाठी इतर राज्याचा आश्रय घेणं हा सरळ सरळ पक्षद्रोह असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, देशातल्या काही स्वायत्त संस्था निवडणूक आयोगासारख्या या दिखाऊ संस्था असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कालपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक प्रश्नांवर धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. . शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत.

तर दुसरीकडे सत्तासंघर्षावर ठाकरे गटाकडून सर्वाोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. आज ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि कामत यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेकसाठी कोर्टाचं कामकाज थांबलं आहे. लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून वरीष्ठ वकील एन. के. कौल युक्तिवादाला सुरुवात करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube