मोठी बातमी! महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयकावर मतदान, बहुमत नसल्याने नामंजूर

यामध्ये 489 एकून मत, बाजूने 278 विरोधात 211 विधेयकाच्या बाजूने 2 तृतीयांश मतदान नाही.

News Photo   2026 04 17T202536.864

मोठी बातमी! महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना विधेयकावर मतदान, बहुमत नसल्याने नामंजूर

लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ (Loksabha) फेररचना विधेयकावर मतदान सुरू आहे. यामध्ये 489 एकून मत, बाजूने 298 विरोधात 230 विधेयकाच्या बाजूने 2 तृतीयांश मतदान नाही. मतदान चालू आहे आकडे बदलू शकतात. हे विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र त्यासाठी 62 मत कमी पडले आहेत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर आज संसदेमध्ये मतदान घेण्यात आलं.

हे बिल मंजूर होऊ शकलेलं नाही. सुरुवातीपासूनच या बिलाला विरोधकांचा विरोध होता. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीच. मात्र 2023 मध्ये पास झालेलं विधेयक आणा असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Video : न तो मुझे और ना ही प्रधानमंत्री को कोई ‘वाइफ़ इश्यू’ है! राहुल गांधींच्या भाषणातील 10 मुद्दे

मणिपूर आणि इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचं उदाहारण देत काँग्रेस नेत्या प्रियकां गांधी यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे. आज महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर संसदेमध्ये मतदान पार पडलं. हे बिल नामंजूर झालं आहे.

हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश म्हणजेच 360 मतांची गरज होती मात्र 62 मत कमी पडल्यानं हे विधेयक नामंजूर झालं आहे. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का आहे. मात्र हे बिल आता जरी नामंजूर झालं असलं तरी देखील आम्ही ते मंजूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिली आहे.

Exit mobile version