Twitter Blue Tick : शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिकही गेलं

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर पुढील हालचालींचा वेग वाढला आहे. यातच उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे. तर शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. निवडणूक […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर पुढील हालचालींचा वेग वाढला आहे. यातच उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे. तर शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह व पक्षाचं नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही बदल केले आहे. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_ असं ठेवण्यात आलं. शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचंही ब्ल्यू टिक गेलं असून त्या हँडलचं नाव आता ShivsenaUBTComm असं ठेवण्यात आलं आहे.

वेबसाईटही बंद पडली…
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने वेबसाईटबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. वरील सोशल मीडिया अकाउंटचे झालेले बदल पाहता आगामी काळात ठाकरे गट वेबसाईटच्या नावातही बदल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हनी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय हॉट

जाणून घ्या Blue टिक का गेलं
कोणत्याही युझर्स अकाउंट ‘व्हेरिफाईड’ झालं की त्याला ब्ल्यू टिक दिलं जातं. यानंतर ट्विटर खात्याचं नाव संबंधित खातेधारकाला केव्हाही बदलता येतं. मात्र, व्हेरिफाईड झालेल्या आणि ब्ल्यू टिक मिळालेल्या खात्याचं ‘हँडल नेम’ बदललं, तर ट्विटर संबंधित खात्याचं ब्ल्यू टिक काढतं. त्यामुळे संबंधितांना ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी पुन्हा आधीप्रमाणे अर्ज करावा लागतो.

Exit mobile version