निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, राऊतानंतर अंबादास दानवेही

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत अपशब्द वापरले होते. यावर माध्यमांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले. यावर दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, यात संजय राऊतांनी काय चुकीचं केलं. असे म्हणत एकप्रकारे दानवे यांनी संजय राऊत यांनी केल्या वक्तव्याचे समर्थनच केल्याच्या यामाध्यमातून दिसून आले आहे. दरम्यान राऊतांच्या […]

Untitled Design (29)

Untitled Design (29)

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत अपशब्द वापरले होते. यावर माध्यमांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले. यावर दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, यात संजय राऊतांनी काय चुकीचं केलं. असे म्हणत एकप्रकारे दानवे यांनी संजय राऊत यांनी केल्या वक्तव्याचे समर्थनच केल्याच्या यामाध्यमातून दिसून आले आहे. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपनेते आशिष शेलार यांनी कडाडून टीका केली होती.

संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत…

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. विविध मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसून येत आहे. यातच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला शिवसेना पक्ष चिन्ह व पक्षाचे नाव देण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेतेमंडळी आक्रमक झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती.

एक आमदार आला तर आनंदोत्सव मात्र पुढच्यावेळी तो आनंद राहणार नाही… विखेंची काँग्रेसवर टीका

आक्रमक पवित्रा घेत राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत अपशब्द वापरले होते. आता याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राऊतांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दानवे यावेळी बोलताना म्हणाले, संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्या घातल्या ते बरोबर केलं. निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे असे दानवे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर भाष्य करणे टाळले.

Exit mobile version