मुंबई : ‘महाराष्ट्र राज्यातून या आधी काही मोठे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले असून आता मुख्यमंत्र्यानी राज्यावर लक्ष ठेवावे. करण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबई मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर नजर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे.’ असा सल्ला राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी ते उद्योजकांना भेटले आहेत. त्यांनी मुंबईत रोड शो केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीकडून योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकारवर टीका केली जात आहे.’
‘त्यावर आता राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे की, ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबई मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर वर नजर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे.’
या अगोदर मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे.
असा आरोप पेटोले यांनी केलाय. तर उद्योगातील गुंतवणुकीसाठी चर्चा करत असतील, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण गुंतवणुकीसाठी रोड शो करत असतील तर हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.