मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सरकारने काय कराव ? याची दिशा ठरत असते. तसेच सरकारचा कारभार कसा सुरू आहे ? याचं प्रतिबिंब यामध्ये असतं. राज्यापालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या सर्वांगीन विकासाचा विचार झाल्याचं दिसतं. पण जेव्हा पुर्वी महाविकास आघाडीचं सरकार होत. तेव्हा केंद्र आणि राज्यात कोणताही समन्वय नव्हता. महाविकास आघाडीचं सरकार अहंकारात बुडलेलं सरकार होतं. विविध योजना त्यावेळी अंशदाना अभावी ठप्प होत्या.
आज विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार प्रविण दरेकर हे राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलत होते. आताच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मात्र अनेक योजना आहेत. तसेच यातून शिंदे-फडणवीस सरकारने यातून कोट्यावधी रूपये आणण्याचं काम केलं आहे. असं यावेळी प्रविण दरेकर यांनी सांगितलं.
चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषा सवंर्धन आणि सीमा भागातील लोकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने काम केलं आहे. त्याचबरोबर उद्योग, गुंतवणुक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीवेळी गुणांकन करण्याचं काम या सरकारने केल्याचं दरेकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विविध कामकाजाची माहिती यावेळी दिली. तर महाविकास आघाडीचं सरकार कसं यामध्ये कमी पडलं हे ही त्यांनी यावेळी सांगितलं.