Vijay Wadettiwar : प्रदेशाध्यक्षांबाबत हायकमांड निर्णय घेईल

बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे.

या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने जर हे केल असेल तर यांच्या बाबतीत हाय कमांड योग्य तो निर्णय येईल. परंतु यामध्ये सत्यता किती आहे हे तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

ते पुढे बोलताना म्हणाले पक्षाला आता कुठे चांगले दिवस येत आहेत, राहुलजी संघर्ष करत आहेत, त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला, विधानपरिषद निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश त्यात कुठे हे अस घडत असेल तर हे चुकीचं आहे.

तसेच सत्यजित तांबेनी जे आरोप केले आहेत त्याबाबत प्रदेश कार्यकरिणी ने खुलासा करावा. प्रदेशने ता बाबत खुलासा केल्याच्या नंतर हे जेकाही घडलं आहे या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन मी आंणि माजी मंत्री सुनील केदार उद्या नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू असे त्यांनी सांगितले

 

 

Exit mobile version