अहमदनगर : समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कर्मठांशी वैरभाव घेऊन एक चांगला समाज जागृतीसाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य त्याकाळीही मार्गदर्शक होत आणि आजही आहे. अशा थोर महात्म्याचं चरित्र आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जयंतीनिमित्त आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जयंतीनिमित्त आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले करण्यात आले. यावेळी डॉ. भि. ना. दहातोंडे यांचाही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन चरित्रावर कायम संशोधनपर लिखान करत असल्याबद्दल त्यांचा पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, संविधान देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘प्रत्येक काळात सामाजाच्या प्रगतीसाठी थोर विभुतींनी समाजामधील अनिष्ठ रुढी-परंपरा मोडीत काढून समाज जागृतीचे काम केले आहे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कर्मठांशी वैरभाव घेऊन एक चांगला समाज जागृतीसाठी प्रयत्न केले. त्यांचे कार्य त्याकाळीही मार्गदर्शक होत आणि आजही आहे. अशा थोर महात्म्याचं चरित्र आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे कार्य प्रा.रतनलाल सोनाग्रा यांनी आपल्या सरल, सोप्या शब्दांत लोकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. या पुस्तकातून आजच्या तरुणांना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याची ओळख चांगल्या पद्धतीने होणार आसल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटले आहे.