Download App

विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत आल्यानं आता सक्षम विरोधी पक्ष  उरला नाही. उद्या पावसाळी अधिवेशन सुरू होते. आणि समोर तगडा विरोधी पक्षच नाही. याच वरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shinde) विरोधकांना टोला लगावला. विरोधी पक्ष गोंधळला आहे. त्यांच्यात अवसान उरल नसल्याचं शिंदे म्हणाले. (The opposition is confused  CM Eknath Shinde Ctitisise)

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. खरंतर विरोधी पक्षाला चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र, ते आले नाहीत. अजित पवार गट सत्तेत आल्यानं आता विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आज राज्यातला विरोधी पक्ष हा आत्मविश्वास आणि अवसान गमावलेला विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष सक्षम नसला तरीही आम्ही विरोधी पक्षाला दुय्यम स्थान देणार नसल्याचं ते म्हणाले.

Devendra Fadnavis ; विरोधकांना अधिवेशनाचा विषयच माहिती नाही, पत्राऐवजी ग्रंथच लिहिला 

आजवर विरोधी पक्ष केवळ सरकारवर टीका करत आला. पण, विरोधकांनी लोकांचे प्रश्न सभागृहात मांडणं महत्वाचं असतं. विरोधकंना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, आजवर सरकारने कायम जनहिताचे निर्णय घेतले. आणि विरोधक मात्र टीका करत राहिले. सरकारला अनधिकृत म्हणणं चुकीचं आहेत. सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशा तारखा विरोधक द्यायचे. मात्र सरकार काही पडलं नाही. आता उलट सरकार अधिक मजबूत झालं. सरकार पडेल असं म्हणू नका, नाहीतर काहीतरी होईल, असा सूचक इशाराही शिंदेनी दिला.

शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा देशात महाराष्ट्राचा परदेशी गुंतवणूकीत पहिला नंबर होता. मध्यंतरी मविआ सरकार आल्यावर कर्नाटक आणि गुजरात नंबर एकवर गेलं होतं. हे तत्कालीन सरकारचं अपयश होतं. आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर महाऱाष्ट्रात 2.38 लाख कोटींच्यावर परदेशी गुंतवणूक झाली आहे. एका वर्षात सरकारने अनेक गेम प्रकल्पांना चालना दिली. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प थांबला होता. त्याचं कामही सुरुळीत सुरू आहे. नमो सरकार योजना सुरू करून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आपल्या सरकारकडून देण्यात येणार आहेत. 1 रुपयात पीक विमा योजना सरकारने सुरू केली मुख्यमंत्री सहायती निधीतून 86 कोटीचं वाटप केलं. आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवल्याची माहिती शिंदेंनी दिली.

यावेळी सीएम शिंदेनी उद्धव ठाकरेंचाही समाचार घेतला. मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्य़ाची चौकशी सुरू करून दुध का दुध और पाणी का पाणी करू, असा इशारा त्यांनी ठाकरेंनी दिला. मुंबई महानगरपालिकेत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप काही जण करतात. ते केवळ खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करतात. मुंबईच्या एफडी  मोडल्याचे आरोप खोटे आहेत. उलट एफडीची रक्कम 77 कोटी होती, ती 88 कोटी झाली असं ते म्हणाले.

Tags

follow us