Download App

‘मला जीवे मारण्याचा डाव’, आव्हाडांनी मारेकऱ्यांचा फोटोच शेअर केला

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवा गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कुणबी जातीचे प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र दिले जाईल, असा अध्यादेश सरकारने काढला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावर आज पत्रकार परिषदेत बोलतांना आव्हाडांनी भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. भुजबळांची मागणी योग्य असल्याचं ते म्हणाले. तुम्ही सरकारमधून बाहेर पडा, आम्ही सोबत आहोत, असं आव्हाड म्हणाले. आव्हाडांनी भुजबळांचं समर्थन केल्यानं मराठा समाज आक्रमक होऊ शकतो.

सीबीएसईच्या पुस्तकात डेंटिंग, रोमान्सचे धडे…; 9 वीचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल 

तर काही दिवसांपूर्वीच आव्हाडांना प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल होतं. त्यामुळं समस्त हिंदु समाज आक्रमक झाला होता. तेव्हा आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस देऊ अशी घोषणाही काही हिंदू संघटनांना केली होती. अशातच आता आव्हाडांना मारण्याचा दोघांचा बेत होता. याबाबतचे दोन व्यक्तीचं संभाषण एका पत्रकाराने ऐकलं आणि आव्हाडांच्या सहकाऱ्यांना सांगितलं. पोलिसांनी आणि आव्हाडांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत संबंधित इसमाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निसटला.

याबाबत आव्हाड यांनी एक ट्वीट करत लिहिलं की, या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्या सोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्या सोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, असं आव्हाडांनी लिहिलं.

 

follow us