थिटेंच्या मागील शक्तीने आमच्या बदनामीचं षडयंत्र रचलं; अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांचे गंभीर आरोप

Rajan Patil यांना थिटेंच्या अर्ज बाद होण्यावर प्रश्न विचारला असता. अजित पवारांचं नाव न घेता गंभीर आरोप केला.

Rajan Patil

Rajan Patil

The power behind Thite conspired to defame us; Rajan Patil’s serious allegations without mentioning Ajit Pawar’s name : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष सध्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे गेल्या 10 दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनगर नगरपरिषद आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाची चर्चा जोराने सुरु आहे. कारण येथे विरोधी उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होऊन अनगर नगरपरिषदेत राजन पाटील यांची सुन प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर अनगरमधील राजकारणात अनेक आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने थेट राजन पाटलांशी संवाद साधला यावेळी त्यांना उज्ज्वला थिटेंच्या अर्ज बाद होण्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता. थिटेंच्या मागे जी शक्ती आहे तिने आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप अजित पवारांचं नाव न घेता केला.

नेमकं काय म्हणाले राजन पाटील?

लेट्सअप मराठीने थेट राजन पाटलांशी संवाद साधला यावेळी त्यांना उज्ज्वला थिटेंच्या अर्ज बाद होण्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता. पाटील म्हणाले की, उज्वला थिटेने अर्ज भरल्याने आमचं काहीही नुकसान होणार नव्हतं. आम्ही तिला अडवलं देखील नव्हतं, पण माध्यमांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यातून आमची आणि अनगर गावाची बदनामी करण्याचं षडयंत्र तिच्या मागे काम करणाऱ्या शक्तीने रचला आहे. त्यांची पोलीस स्टेशनला जाणारी गाडी देखील अडवली नव्हती. त्या रस्त्यावर प्रशासकीय कार्यालयं आणि तालुक्याच्या गावाला जाणारा रस्ता असल्याने तेथे कायम रहदारी असते. असं म्हणत राजन पाटील यांनी अजित पवारांचं नाव न घेता षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या प्रकणावर केलेल्या विस्तृत विश्लेषणाबाबत त्यांचे आभार मानले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी 17 नोव्हेंबरला अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशीच सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या (Anagar Nagar Panchayat Election ) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यावरुन हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. अजित पवार गटाकडून पहाटेच्या सुमारास उज्वला थिटे (Ujwala Thite) यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील भाजपकडून रिंगणात असून अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजन पाटलांनी माझा रस्ता अडवला, दोन दिवसांपासून कार्यकर्ते पाठलाग करत असल्याचा गंभीर आरोप उज्वला थिटे यांनी केला होता. थिटे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करीत राजन पाटलांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांचा अर्ज बाद देखील झाला. त्यामुळे  अनगर नगरपरिषदेत राजन पाटील यांची सुन प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर अनगरमधील राजकारणात अनेक आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे.

Exit mobile version