मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात गर्दी झाली. या गर्दीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हाताने बाजूला केले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलही झाला होता. मात्र त्यानंतर या मिहिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आव्हाड यांना अटकही करण्यात आली होती.
आता पुन्हा या महिलेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रिदा रशीद असे या महिलेचे नाव आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर या विनयभंग प्रकरणी करवाई करण्यात यावी आणि आपल्याला न्याय मिळवा अशी मागणी या महिलेने पुन्हा केली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे रिदा रशीद एक सामाजिक संस्था चालवतात. त्यांनी गरजू महिलांना गैर कृत्य करण्यासाठी भाग पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रिदा रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
यावर आव्हाडांनी पोलिसांना सवाल केला आहे. ‘मुलींना वेश्याव्यवसासाठी प्रवृत्त करणारी व जिच्यावर मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच अल्पवयीन मुलींना परपुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडणारी आणि जीला पोलीस शोधत आहेत. ती रीदा रशीद आज विधानभवनामध्ये उजळ माथ्याने फिरत होती. मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मी भेटले असे तिने सांगितले. तीला पास कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याची ऐशी तैशी…’ असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.