Download App

… तर न सांगता सगळ्या गोष्टी होणार, धनंजय देशमुखांचा प्रशासनाला इशारा

Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या

  • Written By: Last Updated:

Dhananjay Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण राज्यात जण आक्रोश मोर्चे निघत आहे. तर दुसरीकडे आज बीडमध्ये (Beed)संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि न्यायाची मागणी केली.

या आंदोलनानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, ज्या दिवशी आरोपी सरेंडर करतो त्या दिवशी कोर्टात 20- 25 गाड्या आल्या होत्या मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी केली नाही. असा आरोप धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला.  तसेच पोलिसांनी आमची चौकशी कधीही केली नाही. मला कोणावर संशय का? असा प्रश्न देखील पोलिसांनी विचारला नाही. असं देखील धनंजय देशमुख म्हणाले.

माध्यमांशी पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याची देखील माहिती दिली नसल्याचा देखील दावा केला. तसेच या प्रकरणात होत असलेल्या तपासापासून आम्ही समाधानी नाही. असं देखील यावेळी धनंजय देशमुख म्हणाले. तसेच जर यानंतर देखील चुकीच्या गोष्टी घडत असेल तर न सांगता देखील सगळ्या गोष्टी करण्यात येणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

कुंभमेळ्यात शेअर बाजार का घसरतो? मागील 20 वर्षातील धक्कादायक इतिहास

तर दुसरीकडे सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणात आताही एक आरोपी फरार असून इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आज सकाळी धनंजय देशमुख आक्रमक होत स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्यांनी जवळपास दोन तासांपासून अधिक काळ आंदोलन केले त्यानंतर मनोज जरांगे आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले.

follow us