Download App

राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, बच्चू कडूंचा नवा दावा !

  • Written By: Last Updated:

अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)  हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. आताही बच्चू कडू यांनी असचं वक्तव्य केलं आहे. आगामी अधिवेशनाआधी राज्यात मोठा राजकीय धमाका (A political explosion)  होणार असल्याचं भाकीत कडू यांनी केले आहे. येत्या काही दिवसात ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील दहा ते पंधरा आमदारांचा पक्षप्रवेश (party entry)  होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य कडू यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरादार चर्चा सुरु आहे.

 

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांसोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवून आणलं. एकनाथ शिंदेंनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून मोठा धमाका केला होता. आता येत्या काही दिवसात राज्यात आणखी काही नव्या राजकीय घडामोडी घडणार असून मोठा धमाका होणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

Maharashtra Politics नेत्यांच्या गाड्यांचे अपघात सत्र संपेना!… शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले! 

बच्चू कडू म्हणाले, पुढील १५ दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल. मात्र, कोणत्या पक्षाचे आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे, आता ठाकरे गटात आमदार राहिलेच नाही, असं बच्चू कडू म्हणाले. मात्र, नेमके कुठल्या पक्षातील आमदार फुटणार आहेत, याबाबत कडूंनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. दरम्यान, २५ ते ३० आमदार जरी इकडे-तिकडे झाले, तरी सरकार मजबुतीने आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Tags

follow us