Download App

राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती

  • Written By: Last Updated:

मुंबई : 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार (Assembly elections) आहेत. त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) आपली रणनीती आखायला सुरूवात केली. त्यादृष्टीने आज राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यासारख्या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची मााहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाल्यानंतर जयंत पाटील आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर विरोधकांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळं भाजपला सत्तेत खेचण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. त्यासाठीच आता राष्ट्रवादीने आपल्या पक्षात अनेक फेरबदल कऱण्याचे निर्णय घेतले. आगामी निवडणुकांत तरुणांना संधी दिली पाहिजे, ही शरद पवारांची भूमिका असल्याने हे बदल करण्यात येणार असल्याचं बोलल्या जातं.

मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं 

पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात बुथ स्तरावर बांधणीसाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत एक दिवसीय शिबिरे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षांतर्गत निवडणूका तालुका, जिल्हा स्तरावर एक-दीड महिन्यात पूर्ण केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष बदलणार असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच एप्रिल व मे महिन्यात ही पक्ष शिबिरे घेण्यात येणार आहेत. याशिवाय, महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये होत असेल्याबदलांमुळे राष्ट्रवादीतील साचलेपणा दुरू होऊन तरुणांना संधी दिली जातेय का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us