मुंबई : ‘हे सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता. तो कोणाचाही ऐकत नव्हता. तसे हे व्हाईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील, नशीब पोलीस मतदान करत नाहीत, एवढेच राहिलाय आता. नाही तर सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू. असं ही व्हयचं, असं कधी होतं का ? इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नाहीत. तीनचा वार्ड असावा असे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री असताना नक्की झालं, पंधराशे कोटी रुपये खर्च झाला. आता म्हणतायत चारचा वार्ड करा.’
‘कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही सांगू तो कायदा तो पोलिसांनी मानला पाहिजे. असा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात राबवला जात आहे. ठाण्यात टिपून टिपून मारतात तसे टिपून टिपून मारतायेत. मुख्यमंत्र्यांना वाटतय अख्खा ठाणे माझ्या हातात असावं. पवार साहेबांनी बारामतीमध्ये एवढे वर्ष राजकारण केलं. संपूर्ण बारामती त्यांचं नाही होऊ शकलं. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी यावेळी कोणालाही इथे तिथे जाऊ न देता सगळ्यांची घट्ट मोट बांधा. मिळालेल्या नगरसेवकांना निरोप द्या कार्यक्रमाला येत जा. प्रचाराला जितेंद्र आव्हाड याची गरज लागणारच आहे. मी आणि आनंद परांजपे दोघेही आलो असताना नगरसेवकांनी दांड्या मारायचं हे काही योग्य नाही.’ अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना देखील खडसावलं आहे.