Download App

Balasaheb Thorat : ‘आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत’; थोरांतांचा सत्ताधारी पक्षाला इशारा

  • Written By: Last Updated:

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर (Freefighter Savarkar) यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती. याच वक्तव्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधिमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रमिमेला जोडे मारले. या घटनेविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसून विधिमंडळाच्या परिसरात असे प्रकार घडता कामा नये, असं त्यांनी सांगितलं. तर आता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही या घटनेचा निषेध करत सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही, असं शब्दात थोरात यांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची तोफ डागली.

थोरात म्हणाले, आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले आहे. मात्र, ‘ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असं सणसणात उत्तर देता गांभिर्याचा इशारा दिला.

सेन्सॉर बोर्डानं बंदी घातलेले ‘ते’ चित्रपट ओटीटीवर बिनधास्त पाहा; वाचा संपूर्ण लिस्ट 

भाजपाप्रणित शिंदे सरकारचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. आज आम्ही आंदोलने करतो, यापूर्वी आपणही पायऱ्यांवर आंदोलने केली आहेत. या आंदोलनामधून सामान्य जनतेचे प्रश्न सरकारपुढे तीव्रतेने मांडून ते त्वरीत सोडवावे अशी आंदोलकांची मागणी असते. मात्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज जो प्रकार घडला, तो यापूर्वी कधीही घडला नसून लोकशाहीला कलंक लागेल अशी निंदनीय कृती झाली आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी यांचा फोटो पायऱ्यांवर लावला गेला आणि सदर फोटोला चपलाने मारण्याचा प्रकार घडला, असं यापूर्वी कधीही झालं नाही. या निंदनीय करावा तेवढा निषेध कमीच आहे, असं थोरात यांनी सांगितलं.

ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या प्रतिमेबाबत विकृत कृती व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नसून त्यांना सभागृहात बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही. आंदोलनाच्या नावाखाली विकृतकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? असा घणाघात करत थोरात यांनी सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले. शिंदे-फडणवीस गटाच्या सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले यांसारख्या थोर विभूतींबाबत वादग्रस्त वक्तव्य सुरु असतात. अशी वक्तव्ये करुन त्यांनी सातत्याने महापुरुषांचा अपमान केला. पण आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर आणण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरु असून देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला हा कलंक आहे, असेही थोरात म्हणाले.

 

Tags

follow us