Download App

मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं; बावनकुळेंना भेटून खास टिप्स घेईल; अजित पवारांचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

To become Chief Minister will take special tips from Bawankule : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे .सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकार कोसळू शकतं. त्यामुळं भाजपकडून आता हालचाली सुरू झाल्यात. त्याचाच भाग म्हणून अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, अजित पवार यांच्या सीएम होण्याच्या चर्चा काही थांबत नाही. आता तर त्यांचे बॅनर्सही लागत आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असं सांगितलं. दरम्यान, आता यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांच्या तोंडी साखर पडो, असं म्हणत त्यांनी पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. सोबतच मुख्यमंत्री होण्यासाठी बावनकुळेंकडून टिप्स घेईल, असं सांगितलं.

सगळीकडे अजित पवारांचे बॅनर लागत असल्याचं पाहून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री होण्यासाठी काम करावं लागतं. बॅनरबाजी करून मुख्यमंत्री होता येत नाही, अशी टीका केली होती. या टिकेवर आता पवारांना पलटवार केला. अजित पवारांनी सांगितले की, बाळनकुळेंचा सल्ला घेणार आहे. काही कामानिमित्त मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर वेळ मिळाला की, मी लगेच नागपूरला जाऊन बावनकुळेंची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं आणि कसं काम करावं लागत आणि कसं काम केल्यावर आपला पक्ष आपल्याला तिकीट देतो,आणि कसं काम केलं नाही तर तिकीट नाकरतो, बायकोलाही नाकारतो. या सगळ्यांची अतिशय चांगल्या प्रकारे माहीती बावनकुळेंकडून घेतो आणि त्यांचा मोलाचा सल्लादेखील घेतो, असं ते म्हणाले.

भाजपचा राजकीय अजेंडा, आम्ही त्यांच्यासोबत असलो तरी.. सदाभाऊंनी काय ते सांगूनच टाकले !

मागील काही दिवसापांसून अजित पवार यांच्याच नावाची चर्चा आहे. अजित पवार नॉट रिचेबल असतांना ते भाजपसोबत जाणार का? आणि मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उत आला होता. या चर्चेनंतर जित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तरी अजूनही चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. त्यानंतर अजित पवार यांनी पुण्यात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकते. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे बॅनर लागले आहेत. पुणे आणि पुण्याच्या बाहेर मुंबई, नागपूर अशा शहरात देखील पोस्टर झळकत आहेत. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, अजित पवारांचे बॅनर लागत असल्याचं पाहून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अजित पवारांनी मख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं आणि कसं काम करावं लागत आणि कसं काम केल्यावर आपला पक्ष आपल्याला तिकीट देतो, हे बावकुळेंकडून माहिती करून घेतो, असा खोचक टोला लगावला. आता यावर बावनकुळे नेमका काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

 

Tags

follow us